अष्टपैलू नेतृत्व

अष्टपैलू नेतृत्व

Published on

डोकेः मा. संजू परब वाढदिवस विशेष.


swt181.jpg
85220
मुंबई : जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याचे पत्र संजू परब यांना सुपूर्द करताना आमदार दीपक केसरकर. बाजूला अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते.
swt182.jpg
85227
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत संजू परब.
swt183.jpg
85228
सावंतवाडीः पत्नी सौ. संजना, मुली वैष्णवी व सई यांच्या समवेत संजू परब.
swt184.jpg
85276
आमदार नीलेश राणेंसमवेत जिल्हाप्रमुख संजू परब.
swt185.jpg
N85230
संजू परब
swt185.jpg
85275
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकरांसमवेत संजू परब.

अष्टपैलू नेतृत्व

लीड
समाजकारण व राजकारण यांची योग्य सांगड घालत शिवसेना शाखाप्रमुख ते थेट जिल्हाप्रमुख पदापर्यंत मजल मारणाऱ्या सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी राहिला आहे. त्यांच्या अंगी असलेली जिद्द, चिकाटी, अपार मेहनत, महत्त्वाकांक्षा, प्रामाणिकपणा व संघटनकौशल्य या गुणांच्या जोरावर जिल्हाप्रमुख पदाला त्यांनी अवघ्या काही महिन्यांतच योग्य न्याय देत आपल्या नेत्यांना, पक्षाला साजेसे काम केले आहे. आज त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांच्या वाटचालीचा घेतलेला आढावा...
.....................
कोणतीही जबाबदारी असो, ती यशस्वी पार पाडणारच, अशी ओळख असलेले नेतृत्व म्हणजे संजू परब होय. मडुरासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या परब यांच्याकडे दूरदृष्टी असलेले चाणाक्ष नेतृत्व म्हणून पाहिले जाते. उत्तम राजकीय व्यवस्थापनाचे कौशल्य, नावीन्याचा ध्यास आणि दूरदृष्टीचे वरदान, राजकारणातील जाणकार ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच सत्तेच्या राजकीय सारीपाटात एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे वावरणाऱ्या परब यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या गुणाने शिवसेना शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख अशी उत्तुंग झेप घेतली आहे. त्यांनी आजपर्यंतच्या आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये शिवसेना शाखाप्रमुख, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस तालुकाध्यक्ष व त्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा प्रवक्ता ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष अशा विविध जबाबदारीच्या पदांना योग्य न्याय दिला आहे. शिवसेनेचे नेते कुडाळ - मालवणचे आमदार नीलेश राणे हे त्यांचे गुरुतुल्य मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वात अलीकडेच त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या पदावर काम करताना विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेचे उमेदवार असलेल्या दीपक केसरकर यांना निवडून आणण्यामध्ये खारीचा वाटा उचलला. एकूणच या विजयानंतर केसरकर यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवण्यात त्यांना यश आले. त्यांच्या एकूणच कामाची दखल घेत त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली. पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे पद सांभाळताना परब यांनी दोडामार्ग तालुक्यातील परमे आणि कोलझर सहकारी विकास सोसायटीवर शिवसेनेचे पूर्ण पॅनेल निवडून आणल्याचा दावा करत त्यांनी तेथे एकहाती सत्ता आणत या पदाला आपण किती योग्य आहोत, हे दाखवून दिले.
काम कोणतेही असो, एक ध्येय घेऊन झपाटल्याप्रमाणे ते काम करतात. आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने गावागावात भेटी देत मतदारसंघ पिंजून काढत कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्ष संघटना वाढीचे काम अगदी प्रामाणिकपणे करणे, यात त्यांची हातोटी आहे. आपल्या नेत्यावरील टीका असो किंवा अन्य कोणतेही पक्ष विरोधी काम असो, अशावेळी परब यांनी नेहमीच विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. गावागावातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर त्यांची नाळ जोडली गेली असल्यामुळे विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत काम करण्यास नेहमीच इच्छुक असतात. प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जात अडल्या-नडल्यांना पदरमोड करून मदत करणे, हा त्यांचा स्थायीभाव आहे. पदावर असो किंवा नसो, त्यांची सामान्य माणसाशी नाळ जुळलेली आहे.
कोरोनासारख्या महामारीच्या काळात परब यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते. गोरगरीब, परप्रांतीय आदींसारख्या लोकांना संजू परब यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना आर्थिक मदतही पोचवली होती. सॅनिटायझर मास्क यांसारख्या वस्तूंचे वाटपही संपूर्ण शहरात केले होते. दरवर्षी ते आपल्या वाढदिवसाला समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतात. यातूनच ते राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही तितकेच उजवे आहेत, हे दिसून येते. त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे ते भविष्यात राजकारणात उत्तुंग झेप घेतील, यात शंकाच नाही.
......................
कोट
swt1830.jpg
85261
उदय सामंत

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्हाप्रमुख संजू परब हे आमदार नीलेश राणे यांच्या खांद्याला खांदा लावून जोमाने काम करत आहेत. अतिशय संवेदनशील शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा संदेश ते तंतोतंत जोपासत आहेत. सिंधुदुर्गात पक्षवाढीसाठी ते घेत असलेली मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील अन्य जिल्हाप्रमुखांप्रमाणे परब यांच्या कामावरही उपमुख्यमंत्री शिंदे लक्ष ठेवून आहेत. ते परब यांच्या कामावर खूष असून, शिवसेना वाढीसाठी त्यांनी जो संकल्प केला आहे, त्यासाठी आणि त्यांच्या वाढदिवसासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. संजू परब यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत, त्यांना यश प्राप्ती होवो.
- उदय सामंत, उद्योगमंत्री, महाराष्ट्र
........................
swt1831.jpg
85280
दीपक केसरकर

राजकारणात कधी जवळची माणसे दूर जातात, तर कधी दूरची माणसे जवळ येतात. संजू परब यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. एकेकाळी दुरावलेला सहकारी पुन्हा सोबत आल्याचा मला आनंद आहे. परब हे उमदे आणि वाघासारखे काम करणारे नेतृत्व आहे. त्यांनी नगराध्यक्ष म्हणून नगरपरिषदेचा चांगला कारभार हाकला. जर ते आधीच माझ्यासोबत आले असते, तर त्यांनी राजकारणात मोठी आघाडी घेतली असती. पक्षासाठी आता ते ज्याप्रमाणे झटत आहेत, ते पाहता ते जवळच्या सहकाऱ्यांप्रमाणे माझ्या हृद्यात अग्रस्थानी आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून ते माजी नगरसेवक, शहरप्रमुख व इतर सर्व शिवसैनिकांसोबत मिळून काम करत आहेत. त्यांनी संयमाने यापुढे काम करत राहावे, एक दमदार नेतृत्व म्हणून पुढे येण्यासाठी त्यांना वाढदिनी भरभरून शुभेच्छा.
- दीपक केसरकर, आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री.
.......................
swt1832.jpg
85262
नीलेश राणे

संजू परब हे आमच्या कुटुंबातील एक सदस्य असून, त्यांनी सदैव राणे यांनी घेतलेल्या प्रत्येक राजकीय निर्णयाचा सन्मान करून त्याप्रमाणे कृती केली. सावंतवाडी नगराध्यक्ष असताना परब यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत शहराच्या विकासासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. प्रशासन व्यवस्थितरीत्या चालविले. माझ्या भावाप्रमाणे नेहमी माझ्या सोबत असणाऱ्या परब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
- नीलेश राणे, आमदार, कुडाळ-मालवण मतदार संघ
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com