‘डीजीके’ मध्ये क्रीडा सरावाचा प्रारंभ
‘डीजीके’मध्ये
क्रीडा सरावाचा प्रारंभ
रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात क्रीडा विभागांतर्गत क्रीडा स्पर्धांच्या सरावाचा प्रारंभ करण्यात आला. भारत शिक्षण मंडळ संस्थेचे उपकार्याध्यक्ष चंद्रकांत घवाळी व चंद्रशेखर केळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा सराव करताना घ्यावयाची काळजी व क्रीडा प्रकारांमध्ये यश मिळवण्यासाठी लागणारी मेहनत व कौशल्ये याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्र. प्रा. मधुरा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. क्रीडा सराव उद्घाटनप्रसंगी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. टीवायबीकॉम (मुले) संघ विजेता झाला आणि टीवायबीए (मुले) संघाने उपविजेतेपद मिळवले. मुलींमध्ये बीएस्सी संघ विजेता झाला व एसवायबीकॉम संघ उपविजेता ठरला.
--------
विद्यार्थिनी रंगल्या
पारंपरिक खेळात
रत्नागिरी : फाटक हायस्कूल व श्रीमान व वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी श्रावणातील पारंपरिक खेळांचे आयोजन सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले. आधुनिकतेबरोबरच परंपरा जपणाऱ्या फाटक हायस्कूलने विद्यार्थिनींमध्ये पारंपरिक खेळांची आवड निर्माण करणे, त्या खेळांचे सांस्कृतिक आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व पटवून देणे या उद्देशाने पारंपरिक खेळांचे आयोजन केले. आरोग्य आणि मनोरंजनाची उत्तम सांगड घालत विद्यार्थिनींनी पिंगा, झिम्मा, फुगडी, होडी आदी खेळप्रकारांचे उत्साही आणि उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले. मंगळागौरीच्या आरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत आणि पारंपरिक गाण्यांच्या तालावर व खेळांचे सादरीकरण केले. नववी ते बारावीच्या ३५० विद्यार्थिनी आणि शिक्षिका सहभागी झाल्या.
-----
चिपळूणमध्ये निबंध,
वक्तृत्व स्पर्धा
चिपळूण ः येथील ‘पूज्य गांधी प्रतिष्ठान चिपळूण’ संस्थेच्या वतीने २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय व गट पुढीलप्रमाणे ः प्राथमिक गट (५वी ते ७वी) स्वच्छता व गांधीजी, गांधीजींवरील आईचे संस्कार. माध्यमिक गट (८वी ते १०वी) परिसर स्वच्छता व आपण, चले जाव चळवळ. कनिष्ठ महाविद्यालयीन गट (११वी व १२वी) स्वच्छता ही स्थानिक स्वराज्य संस्थांचीच जबाबदारी आहे का?, गांधीजींची अहिंसा. वरिष्ठ महाविद्यालयीन व खुला गट- पर्यावरण रक्षणाचे आव्हान, गांधीजींचा जगावरील प्रभाव. ही स्पर्धा जिल्हास्तरावरील असून मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी एका भाषेत सहभाग घेता येईल.
----
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.