श्रावणातील अखेरच्या सोमवारी भक्तिभावाची उधळण

श्रावणातील अखेरच्या सोमवारी भक्तिभावाची उधळण

Published on

85315
देवगड : तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांग होती.
85316
देवगड ः तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिरातील फुलांनी सजवलेली पिंडी. (छायाचित्रे ः संतोष कुळकर्णी)


श्रावणातील अखेरच्या सोमवारी भक्तिभावाची उधळण

कुणकेश्वर मंदिरात भाविकांचा महासागर; पावसाच्या सरीही थांबवू न शकल्या श्रद्धेची ओढ

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ : तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात आजच्या अखेरच्या श्रावण सोमवारनिमित्ताने भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. आज सकाळपासून पावसाचा जोर असूनही मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. दिवसभरात मान्यवरांसह विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळीनी दर्शन घेतले. दरम्यान, येथील शहरातील श्री ब्राह्मणदेव मंदिरासह तालुक्यातील वाडा येथील श्री देव विमलेश्‍वर मंदिर, विजयदुर्ग येथील श्री देव रामेश्‍वर मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले.
श्रावण महिन्यातील आजचा चौथा आणि अखेरचा सोमवार होता. यानिमित्ताने श्री देव कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. मंदिरात विधिवत पूजा झाल्यावर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले होते. येथील तहसीलदार आर. जे. पवार, माजी आमदार प्रमोद जठार यांनी दर्शन घेतले. दिवसभरात विविध मान्यवर तसेच राजकीय नेतेमंडळींनी दर्शन घेतले. मंदिरात विविध भजने सुरू होती. त्याला श्रोत्यांकडून प्रतिसाद मिळत होता. खासगी तसेच प्रवासी वाहने घेऊन भाविक दर्शनासाठी येत होते. कुणकेश्‍वर मार्गावर जादा एसटी गाडी सोडली होती. तालुक्यासह जिल्हा तसेच परजिल्ह्यांतील भाविक दर्शनासाठी आल्याचे चित्र होते. मंदिर परिसर भाविकांनी गजबजला होता. रविवारी रात्रीसह आज सकाळपासून किनारी भागात पावसाने जोर धरला होता, तरीही मंदिरात भाविकांची दर्शनासाठी वर्दळ होती. मंदिर परिसरात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था होती.
-----
देवगडच्या इतर मंदिरांमध्येही गर्दी...
मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी कार्यरत होते. मंदिरात उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते. कुणकेश्‍वर मार्गावर वाहनांची वर्दळ सुरू होती. मंदिर आणि परिसरात भाविकांची वर्दळ होती. मंदिरात दुपारी खिचडी प्रसाद वाटप झाला. दरम्यान, येथील शहरातील श्री ब्राह्मणदेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. तालुक्यातील वाडा येथील श्री देव विमलेश्‍वर मंदिर, विजयदुर्ग येथील श्री देव रामेश्‍वर मंदिर येथेही दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होती.

Marathi News Esakal
www.esakal.com