भारतीय उत्सवांमधून एकीचे दर्शन

भारतीय उत्सवांमधून एकीचे दर्शन

Published on

85324

भारतीय उत्सवांमधून एकीचे दर्शन

पालकमंत्री नीतेश राणे ः सावंतवाडीत भाजपच्या दहिहंडीस भेट

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माध्यमातून आयोजित भव्य दहिहंडी पाहण्याचा आज प्रथमच योग आला. दहिहंडी हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा सण आहे. दहीहंडीच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधव एकत्र येतात. हिंदू राष्ट्रांमध्ये सर्वांत मोठी ताकद ही केवळ हिंदूंचीच आहे, हे दाखवून देण्याची संधी या सणांच्या माध्यमातून प्राप्त होते. त्यामुळे अशी एकी नेहमीच दाखवून द्या, असे आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
शनिवारी (ता. १६) रात्री बारापर्यंत केवळ मुंबई व ठाण्यातच दहिहंडी उत्सवासाठी दहिहंडीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात, हे पाहिले होते; मात्र सावंतवाडी शहरात देखील रात्री उशिरापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने हा उत्सव पाहण्यासाठी नागरिक उपस्थित असल्याचे पाहून आनंद वाटला. यानिमित्ताने आज सावंतवाडीकरांनी थक्क करून टाकले, अशा शब्दांत त्यांनी सावंतवाडीकरांचे कौतुक केले.
भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून येथील आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाला रात्री उशिरा पालकमंत्री राणे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गावडे यांचे कौतुक व अभिनंदन केले. व्यासपीठावर भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, युवा नेते संदीप गावडे, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, दिलीप भालेकर, जितेंद्र गावकर, अनिकेत आसोलकर त्यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री राणे यांच्या हस्ते शहरातील २१ दहिहंड्या फोडल्यानंतर संदीप गावडे आयोजित दहिहंडी उत्सवात पाच थरांची सलामी देणाऱ्या अमेय तेंडुलकर मित्रमंडळ गोविंदा पथकाला सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गोविंदा तसेच दहीहंडीप्रेमी उपस्थित होते.
.....................
गावडेंचे राजकीय भविष्य उज्वल
संदीप गावडे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पडतात, हे ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून समोर आले. त्यांनी केलेल्या यशस्वी नियोजनामुळेच या अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम आला. त्यांचे काम आणि कार्य पाहता भविष्यात ते निश्चितच वेगळी उंची गाठतील, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी काढले. भाजपचे युवा नेतृत्व संदीप गावडे आयोजित सुंदरवाडी दहीहंडी उत्सवाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, युवा नेते संदीप गावडे, संदीप गावडे यांच्या मातोश्री सौ. सुनीता गावडे, वडील एकनाथ गावडे, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, पंकज पेडणेकर, दिलीप भालेकर, शेखर गावकर, शर्वाणी गावकर, शीतल राऊळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com