माकडांचा उपद्रव थांबवण्यासाठी औषध
-rat१८p२४.jpg
२५N८५२५१
ःराजापूर ः पत्रकार परिषदेत बोलताना पितांबरी उद्योगसमूहाचे डॉ. रवींद्र प्रभूदेसाई. शेजारी मान्यवर
----
माकडांचा उपद्रव थांबवण्यासाठी औषध
डॉ. रवींद्र प्रभुदेसाई ः शेती-बागायत परिसरात वापरल्यास नियंत्रण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ ः कोकणात माकडांचा उपद्रव वाढला असून, झुंडीने फिरणारी माकडे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. याला आळा घालण्यासाठी पितांबरीतर्फे संशोधन सुरू होते. त्यात यश आले असून, ‘अनिल रिपेलंट’ या नावाचे औषध तयार केले आहे. या औषधाचा बागायत किंवा शेतीच्या सभोवार वापर केल्यास त्याच्या वासाने माकडं शेतीकडे फिरकत नाहीत. त्यामुळे माकडांचा उपद्रव कमी होईल, असे पितांबरी उद्योगसमूहाचे प्रमुख डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी दिली.
तालुक्यातील तळवडे येथे शासनमान्य माळी प्रशिक्षणांतर्गत सुरू केलेल्या बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव पुजारी, तळवडेच्या सरपंच गायत्री साळवी आदी उपस्थित होते. तळवडे-ताम्हाणे रस्त्यालगत वड, पिंपळ, औदुंबरासारखी सुमारे पाच हजार झाडांची लागवड केल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षापासून कोकणातील शेतकर्यांना माकडांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या फळबागायती नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. योग्य त्या उपाययोजना करून माकडांचा त्रास कमी करावा, अशी सातत्याने शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. माकडांना पकडण्याचा उपक्रम वनविभागाने हाती घेतला असला तरीही त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. माकडांना आळा घालण्यासाठी पितांबरी उद्योगसमूहाने सखोल संशोधन करून बाजारात औषध आणल्याची माहिती डॉ. प्रभुदेसाई यांनी दिली. हे औषध बागायतीच्या परिसरात टाकायचे आहे. त्या वासाने माकडं बागायती किंवा शेतीकडे फिरकणार नाहीत. त्यांचा उपद्रवही कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
चौकट
विद्यार्थ्यांना रोजगार संधी
तळवडे येथे सुरू केलेल्या केंद्राद्वारे विविध प्रकारच्या बागायती, हिरवळ आणि पर्यावरणीय व्यवस्थापनावर आधारित तांत्रिक ज्ञान, कौशल्य आणि प्रशिक्षण देणे हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम आधुनिक शेती आणि बागायती कामात काम करणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाचा आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रथमच खासगी आस्थापनेला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यात प्रशिक्षण घेऊन स्थानिक शेतकरी आणि बागकाम करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध होतील, असे डॉ. प्रभुदेसाई यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.