प्रयोगकौशल्य कार्यशाळा

प्रयोगकौशल्य कार्यशाळा

Published on

‘देव, घैसास’मध्ये
प्रयोगकौशल्य कार्यशाळा
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रयोगकौशल्य व उपकरण हाताळणी कार्यशाळा विज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी झाली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करताना वेगवेगळी उपकरणे कशी हाताळावी व विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. नंतरच्या कालावधीत विद्यार्थी प्रयोगशाळेत उपकरणे कशी हाताळतात यांचे शिक्षकांनी निरीक्षण केले. या कार्यशाळेत रसायनशास्त्र विभागाच्या प्रा. आसावरी मयेकर, प्रा. मिथिला वाडेकर, प्रा. सुमित सामंत, भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. वैभव घाणेकर, वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा. विनय कलमकर, प्राणिशास्त्र विभागाच्या प्रा. सानिका कीर व प्रा. मोहिनी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बियाणी बालमंदिरात
श्रावणोत्सव साजरा
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या बियाणी बालमंदिर भिडेआजी खेळघरमध्ये श्रावणोत्सव साजरा झाला. बालकांसाठी जीवतीपूजन, पालक भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. झिम्मा फुगड्यांनी सभागृह दणाणून गेले. भगिनींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मालती खवळे उपस्थित होत्या. त्यांनी पालक भगिनींना बालवयात केलेले संस्कार किती महत्त्वाचे आहेत, शाळा आणि घर यामध्ये कसा समन्वय साधला पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले. या वेळी अपर्णा गोगटे, आरती केसरकर यांनी सुरेख गाणी गायली. प्रास्ताविक बालमंदिरच्या मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी केले.

डीजीके कॉलेजमध्ये
टिळक परीक्षा
रत्नागिरी : देव, घैसास, कीर (डीजीके) वरिष्ठ महाविद्यालयामध्ये इतिहास विभाग व आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळकांच्या जीवनाविषयी परीक्षेचे आयोजन करण्यात आले. इतिहास विभागप्रमुख प्रा. मंदार बेटकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या मधुरा पाटील उपस्थित होत्या. मुलांना प्रश्नांमार्फत इतिहास कळावा, या उद्देशाने एक नवीन उपक्रम करण्यात आला. इतिहास विषयाचे द्वितीय, तृतीय या वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर्या पावरी हिने केले.

दुचाकी फेरीत
स्वयंसेवकांचा सहभाग
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या डीजीके कॉलेजच्या एनएसएसमधील २० स्वयंसेवकांनी आंतरराष्ट्रीय युवादिनाच्या निमित्ताने जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे आयोजित बाईक रॅलीत भाग घेतला. सर्वसामान्य जनतेमध्ये एड्सविरोधी जनजागृती करणे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून एचआयव्ही तपासणीस प्रोत्साहित करण्यासाठी या रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीचे उद्‍घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. रश्मी आठल्ये, सचिन पाटील उपस्थित होते. रुग्णालय, जयस्तंभमार्गे एसटी स्टँड येथे वळसा घेऊन साळवी स्टॉपमार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालय असा रॅलीचा मार्ग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com