विज्ञान युगात शोधाचे जनक व्हा

विज्ञान युगात शोधाचे जनक व्हा

Published on

85511

विज्ञान युगात शोधाचे जनक व्हा

प्रमोद जठार ः किल्ले विजयदुर्गवर ‘हेलियम डे’ उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १९ ः हेलियमचे पाळणाघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तालुक्यातील किल्ले विजयदुर्गवर आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ‘जागतिक हेलियम डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. आजचा दिवस म्हणजे विज्ञानातील एका शोधाचा वाढदिवस असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात असे तंत्रज्ञान, विज्ञान याच्या शोधाचे जनक होण्याचे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी केले.
१८ ऑगस्ट १८६८ ला सूर्यग्रहणावेळी नॉर्मन लॅकियर या शास्त्रज्ञाने किल्ले विजयदुर्गवर ज्या ठिकाणी आपली दुर्बिण लावून हेलियम वायूचा शोध लावला होता, त्या ‘साहेबांचे ओटे’ या ठिकाणी मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. आज हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अवकाशात फुगे सोडून आनंद व्यक्त करण्यात आला. पावसाळ्यातील हिरवळीने नटलेल्या किल्ले विजयदुर्गला मुलांच्या घोषणा आणि किलबिटाने जाग आली होती. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह सौ. नीरजा जठार, मानसी वाळवे, सुहास नाईक साटम, विजयदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, पवन परुळेकर, राजेंद्र परुळेकर, डॉ. सुनील आठवले, प्रभारी सरपंच रियाज काझी, संजना आळवे, रवींद्र तिर्लोटकर, प्रदीप साखरकर, शुभा कदम, दिनेश जावकर, ग्रेसीस फर्नांडिस, रवी शेटये, रोहित महाडिक तसेच अन्य मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
----
‘विजयदुर्ग’वरून हेलियम वायुचा शोध
श्री. जठार यांनी, किल्ले विजयदुर्गवरून शास्त्रज्ञांनी हेलियम वायुचा शोध लावल्यामुळे या ठिकाणाला फार मोठे महत्त्व आहे. आजचा दिवस विज्ञानातील एका शोधाचा वाढदिवस आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात शोधाचे जनक होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांनी हेलियम वायुविषयी मार्गदर्शन केले. पाऊस असूनही किल्ले विजयदुर्गवर ‘हेलियम डे’ उत्साहात साजरा झाला. सुरुवातीला ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. या मिरवणुकीत ढोल पथकासह विविध मान्यवर, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com