चिरेखाणीतील माती, कागदापासून पर्यावरणपूरक मूर्ती
-rat१९p१९.jpg-
२५N८५५२९
साखरपा : कळंबटे यांच्या गणेश मूर्तिशाळेत तयार झालेल्या चिरा, कागद आणि शाडूमातीच्या गणेशमूर्ती.
---
येई गणेशा.........लोगो
चिरेखाणीतील माती, शाडूमातीपासून पर्यावरणपूरक मूर्ती
झरेवाडीतील कळंबटे कुटुंबाचा प्रयोग; प्लास्टरच्या मूर्तींना फाटा
अमित पंडित ः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १९ : पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी गणेशमूर्तींची निर्मिती करण्याचे काही प्रयोग मूर्तिकार करत असतात. त्यापैकी एक म्हणजे झरेवाडी (ता. रत्नागिरी) येथील कळंबटे कुटुंब होय. कळंबटे कुटुंबीयांची तिसरी पिढी गणेश मूर्तिशाळा चालवत आहे. चिरेखाणीतील माती, कागद आणि शाडूमातीपासून ते पर्यावरणपूरक मूर्ती बनवत आले आहेत.
गणेशमूर्ती तयार करण्याची सुरुवात बाबाजी कळंबटे यांनी केली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव रमेश कळंबटे यांनी ती दुसऱ्या पिढीत सुरू ठेवली. आता त्यांचे दोन पुत्र राहुल आणि रोहित हेही मूर्तिशाळा चालवत आहेत. त्यांच्या मूर्तिशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तीन पिढ्यांनी प्लास्टरच्या मूर्ती बनवलेल्या नाहीत. प्लास्टरच्या मूर्ती निसर्गाला हानिकारक असतात, ही बाब लक्षात घेऊन मूर्तिशाळेचे निर्माते बाबाजी कळंबटे यांनी प्रथमपासूनच शाडू मातीच्या मूर्ती करण्याचा ध्यास घेतला.
गेल्या चार वर्षांपासून कळंबटे कुटुंबीय एक अभिनव प्रयोग करत आहेत. कोकणात चिऱ्याच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्या खाणीतून चिरे काढून झाल्यावर उरणाऱ्या लाल मातीचा वापर कळंबटे कुटुंबीय मूर्ती तयार करण्यासाठी करतात. या मातीत ते कागदाचा लगदा आणि शाडूची माती मिसळून मूर्तीसाठी लागणारी माती तयार करतात. चिरेखाणीवरून आणलेली माती ही आधी चाळून घ्यावी लागते. त्यातील दगड काढून टाकले जातात. त्यानंतर त्यात शाडू माती आणि कागद मिसळला जातो. हे सगळे मिक्सरमधून एकजीव केले जाते आणि त्यापासून आवश्यक तो मातीचा गोळा तयार केला जातो. साधारण ३० टक्के शाडूची माती, ३५ टक्के चिरेखाणीतील लाल माती आणि तितकाच कागदाचा लगदा अशा प्रमाणात सर्व घेऊन त्यात गोंद मिसळून ते आवश्यक तो मातीचा गोळा तयार करतात. गोंद मिसळल्याने त्या मूर्तीला कडकपणा येतो, असे त्यांनी सांगितले.
चौकट
टाळेबंदीत नवीन प्रयोगाची कल्पना
कोरोना काळात कळंबटे यांच्या मूर्तिशाळेवर मोठा परिणाम झाला. वाहतूक बंद असल्यामुळे दरवर्षी आवश्यक तितकी शाडू माती त्यांना मिळाली नाही. अशावेळी नेहमीच्या भाविकांना देता येतील इतक्या मूर्ती तयार कशा करायच्या, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. शिल्लक राहिलेल्या शाडू मातीत लाल माती मिसळून मूर्ती तयार करण्याची कल्पना सुचल्याचे कळंबटे यांनी सांगितले. पहिल्या वर्षी त्यांनी ४० मूर्ती तयार केल्या आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी तो पुढे सुरू ठेवला. यंदा हा आकडा दुप्पट झाला आहे.
चौकट
पेपरपासून गणेशमूर्ती
राहुल आणि रोहित कळंबटे हे दोघेही देवरूखच्या डी-कॅड विद्यालयाचे विद्यार्थी. तिथे त्यांनी पेपरपासून मूर्तिकला शिकली होती. त्याचा उपयोग पुढे या व्यवसायात झाल्याचे त्यांनी सांगितले. हाती गणेशमूर्ती तयार करणे खरे कसब पणाला लागत असल्याचे रोहित सांगतात. तिथे खरी कला दिसून येते. अशा मूर्ती करण्याला वेळ लागत असला तरी हाती मूर्ती करताना खरा आनंद मिळत असल्याचे राहुल यांनी सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.