राजापूरमध्ये नगरसेवकांची संख्या वीस

राजापूरमध्ये नगरसेवकांची संख्या वीस

Published on

- rat२०p२४.jpg
P२५N८५७८०
राजापूर नगरपालिका

राजापुरात नगरसेवकांची संख्या वीस
प्रारूप प्रभाग रचना जाहीर; ३१ पर्यंत मागवल्या हरकती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः राजापूर नगरपालिकेतील प्रारूप प्रभाग रचना निश्‍चित झाली असून, त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती वा सूचना मागवण्यात आल्या आहेत. प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर झाल्याने पालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रभाग रचनेत पूर्वीच्या ८ प्रभागांचे १० प्रभाग झाले असून, नगरसेवकांची संख्या २० वर पोचली आहे.
प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर गेली तीन वर्षे रखडलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर निर्धारित कालावधीत किती हरकती दाखल होणार, याकडे साऱ्‍यांचे लक्ष लागले आहे. प्रभाग १ मध्ये १ हजार ७ लोकसंख्या आहे तर प्रभाग २ मध्ये लोकसंख्या ९७६, प्रभाग ३ ची लोकसंख्या ८८८, प्रभाग ४ ची लोकसंख्या ८९०, प्रभाग ५ ची लोकसंख्या ९०१ असून, प्रभाग ६ ची लोकसंख्या १ हजार ४०, प्रभाग ७ मध्ये १ हजार १२४, प्रभाग ८ मधील लोकसंख्या ९२० आहे तसेच प्रभाग ९ मध्ये ८८८ लोकसंख्या असून, प्रभाग १० ची लोकसंख्या १ हजार ११९ आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com