वेंगुर्लेत रोटरी क्लबतर्फे
‘निक्षय मित्र’ कार्यक्रम

वेंगुर्लेत रोटरी क्लबतर्फे ‘निक्षय मित्र’ कार्यक्रम

Published on

वेंगुर्लेत रोटरी क्लबतर्फे
‘निक्षय मित्र’ कार्यक्रम
वेंगुर्ले ः रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ले मिडटाऊनतर्फे येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्रधानमंत्री ‘टीबीमुक्त भारत’ अभियानांतर्गत ‘निक्षय मित्र’ कार्यक्रम घेण्यात आला. यात रोटरी सदस्यांकडून तालुक्यातील एकूण बारा टीबी रुग्णांना पौष्टिक आहार तसेच २६ कुपोषित मुलांना प्रोटिन पावडर व प्रोटिनयुक्त औषधे दिली. या उपक्रमासाठी रोटरीचे अध्यक्ष आनंद बोवलेकर, सेक्रेटरी डॉ. राजेश्वर उबाळे, संजय पुनाळेकर, राजन गिरप, दीपक ठाकूर, दिलीप शितोळे, किरण कुबल, आनंद बांदेकर, धनेश आंदुर्लेकर, सुनील रेडकर, शंकर वजराटकर, डॉ. वसंतराव पाटोळे आदींनी सहकार्य केले. राजेश घाटवळ, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. संदीप सावंत, सुरेश मोरजकर, आरोग्य पर्यवेक्षक रमेश परब, सखाराम वराडकर आदी उपस्थित होते.
---
एसटी कर्मचाऱ्यांचे
निलंबन अखेर मागे
कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रा. प. महामंडळ विभागीय कार्यालयाकडून नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यासाठी सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संदेश सावंत तसेच भाजप कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार १९ ऑगस्टला कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्याची माहिती कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राणे यांनी दिली.
.....................
मातोंड-बांबर शाळेत
स्वच्छतागृह सुविधा
वेंगुर्ले ः येथील पंचायत समितीतर्फे ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ कार्यक्रमांतर्गत मातोंड-बांबर शाळा क्र. ५ येथे सार्वजनिक शौचालयाचे उद्‍घाटन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. मातोंड बांबर शाळेत शासनाच्या स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व मातोंड ग्रामपंचायत यांच्या निधीतून हे सार्वजनिक शौचालय बांधले आहे. या कार्यक्रमप्रसंगी कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता प्रफुल्लकुमार शिंदे, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) गुरुनाथ धुरी, कनिष्ठ अभियंता अनुप वळवी, गट समन्वयक द्रौपदी नाईक, ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे, उपसरपंच आनंद परब, मुख्याध्यापक सरमळकर आदी उपस्थित होते.
....................
रेडी सोसायटीची
आज वार्षिक सभा
आरोंदा ः रेडी ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थेची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. २१) दुपारी २.३० वाजता संस्थेच्या चेअरमन चित्रा कनयाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्था कार्यालयाच्या बाजूला घेण्यात येणार आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन कनयाळकर, सचिव सदानंद नाईक यांनी केले आहे.
---
85843

विलास साळसकर
यांची नियुक्ती
देवगड ः येथील शिंदेगट शिवसेना तालुकाप्रमुखपदी विलास साळसकर यांची निवड झाली. आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपनेते संजय आग्रे, महिला जिल्हाध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, महिला उपजिल्हाप्रमुख सरिता राऊत, बबन शिंदे, महिला देवगड तालुकाध्यक्ष नीता गुरव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com