युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांना मोठी संधी

युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांना मोठी संधी

Published on

-rat२१p२३.jpg-
२५N८६०७५
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात युवा महोत्सवाचे उद्‍घाटन करताना डॉ. नीलेश सावे. सोबत नमिता कीर, डॉ. आनंद आंबेकर, मधुरा पाटील आदी.
------------
युवा महोत्सवाकडे सकारात्मकतेने बघा
डॉ. नीलेश सावे ः देव, घैसास, कीर महाविद्यालयात आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : युवा महोत्सवाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. पूर्वी अशी संधी सर्वांना मिळत नव्हती. मुंबईत जाऊन स्पर्धा करणे शक्य नव्हते; पण रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये प्राथमिक फेऱ्या सुरू झाल्या व राष्ट्रीय पातळीवरही इथले विद्यार्थी चमकू लागले. स्वतःला पारखून बघायचे असेल तर यासारखा रंगमंच कुठेच मिळणार नाही. ओंकार भोजने, प्रथमेश शिवलकर या कलाकारांनीही युवा महोत्सवातून सुरुवात केली. आज हे कलाकार मालिका, चित्रपटांमध्ये चमकत आहेत, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. नीलेश सावे यांनी केले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात दक्षिण रत्नागिरीतील १६ महाविद्यालयांच्या युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी आज झाली. या महोत्सवाचे उद्‍घाटन दीपप्रज्वलनाने केल्यानंतर डॉ. सावे बोलत होते.
डॉ. सावे यांनी युवा महोत्सवासाच्या नियोजनासाठी देव, घैसास, कीर महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. मी विद्यार्थी असल्यापासून म्हणजे १९९५ पासून जवळपास ३० वर्षे या महोत्सवाशी निगडित आहे. मी सुद्धा या महोत्सवातूनच घडल्याचे ते म्हणाले. या वेळी सांस्कृतिकचे जिल्हा समन्वयक आंबेकर, सहसमन्वयक डॉ. तारांचद ढोबळे, सदस्य विनायक हातखंबकर, प्र. प्राचार्य मधुरा पाटील, उपप्राचार्य प्रा. वसुंधरा जाधव, सांस्कृतिक प्रमुख ऋतुजा भोवड उपस्थित होत्या.
नमिता कीर म्हणाल्या की, मोठ्या महाविद्यालयांप्रमाणे आता लहान लहान महाविद्यालयांना विद्यापीठाच्या युवा महोत्सव भरवण्याची संधी मिळत आहे, ही चांगली गोष्ट आहे. यातून अनेक विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ मिळणार आहे. डॉ. आनंद आंबेकर यांनी या महोत्सवासाठी प्रोत्साहन, प्रेरणा दिली. युवा महोत्सवात दिवसभर १६ महाविद्यालयांतील जवळपास ६०० विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत, ललित कला आणि साहित्याच्या ३७ स्पर्धांमध्ये भाग घेतला.

कोट
तरुणाईच्या ऊर्जा व उत्साहाचा हा सोहळा आहे. युवा महोत्सवाने आत्मविश्वास दुणावला आहे. युवाशक्तीच्या ऊर्जेला संधी, प्रोत्साहन व योग्य दिशा द्यावी लागते. त्यासाठी हा युवा महोत्सव एक चार्जिंग स्टेशनच म्हणावा लागेल.
- मधुरा पाटील, प्र. प्राचार्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com