ःपैसा फंडच्या ६०० विद्यार्थ्यांना मंत्री सामंतांकडुन मोफत छत्र्या
rat२३p६.jpg-
२५N८६५२१
संगमेश्वर - पैसाफंड इंग्लिश स्कूल आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले.
पैसाफंडच्या विद्यार्थ्यांना मोफत छत्र्या
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २३ ः उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यातर्फे व्यापारी पैसाफंड संस्था संचलित पैसाफंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वरमधील ६०० विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाबद्दल व्यापारी पैसाफंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, संस्था सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे यांनी उद्योगमंत्री सामंत यांना धन्यवाद देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप रहाटे यांनी यांनी या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाला प्रशालेचे सचिव धनंजय शेट्ये मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश दळवी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.