स्वच्छता मोहिमेद्वारे क्रांतिकारकांचे स्मरण
swt2310.jpg
86528
डेगवेः आद्य क्रांतिकारकांच्या स्मृतीसाठी साफसफाई मोहीम राबविताना बांदा मंडल भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
स्वच्छता मोहिमेद्वारे क्रांतिकारकांचे स्मरण
बांद्यात भाजपचा उपक्रमः केशव गवस, देऊ हळदणकरांना आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ः स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज राजवटीविरोधात १८४४ मध्ये पहिल्या क्रांतीची नोंद डेगवे गावात झाली. येथे इंग्रज अधिकारी लॉर्ड विल्यम फावरे याला आद्य क्रांतिकारक केशव गोविंद गवस-देसाई यांनी गोळी घालून ठार केले. या कृत्याचा आरोप स्वतःवर घेतलेल्या डेगवेतील क्रांतिकारक देऊ हळदणकर-नाईक यांना इंग्रजांनी फासावर चढविले. या आद्य क्रांतिकारकांचे शौर्य आजच्या पिढीला समजावे, यासाठी त्या ठिकाणी भाजप बांदा मंडलतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा संघचालक अरविंद कुडतरकर, संघाचे जिल्हा कुटुंब प्रबोधक भास्कर साधले, डेगवे येथील संघाचे स्वयंसेवक मधुकर उमाजी देसाई, संघ स्वयंसेवक स्वप्नील पाडगावकर, बांदा मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, बांदा मंडल उपाध्यक्ष गुरुदत्त कल्याणकर, डेगवे सरपंच राजन देसाई, उपसरपंच मंगेश देसाई, रत्नाकर आगलावे, नीलेश सावंत, राकेश केसरकर, हेमंत दाभोलकर, डेगवे माजी सरपंच प्रवीण देसाई, राजेश देसाई, मधुकर देसाई, महेश स्वार, नवनीत देसाई आदी उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी १८४४ मध्ये इंग्रज अधिकारी लॉर्ड विल्यम फावरे याला ठार मारल्याचा आरोप आपल्यावर घेऊन फाशी गेलेल्या हुतात्मा देऊ नाईक (हळणकर) यांच्या फाशी दिलेल्या डेगवे येथील ठिकाणी भाजप बांदा मंडलातर्फे स्वच्छता अभियान राबवत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. इंग्रजांविरुद्ध देशात पहिली क्रांती १८५७ मध्ये झाली; मात्र तत्पूर्वीही तेरा वर्षे आधी म्हणजेच १८४४ मध्ये इंग्रज अधिकारी लॉर्ड विल्यम फावरे यांचा केशव गवस देसाई यांनी बांदा येथे गोळ्या घालून वध केला. या क्रांतिकारकांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने स्थानिकांचा छळ सुरू केला. हा छळ सहन न झाल्याने तेथीलच क्रांतिकारक देऊ हळदणकर-नाईक यांनी स्वतः पुढे येत आपणच वध केल्याचे मान्य केले. त्या वेळी त्यांना काजऱ्याच्या झाडावर फासावर चढवण्यात आले. या ठिकाणी भाजपने स्वच्छता मोहीम राबवत इतिहासाला उजाळा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.