तळवणेत विद्यार्थ्यांची गणेशमूर्ती शाळेला भेट

तळवणेत विद्यार्थ्यांची गणेशमूर्ती शाळेला भेट

Published on

swt2315.jpg
86555
तळवणेः शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती शाळेला भेट दिली.

तळवणेत विद्यार्थ्यांची
गणेशमूर्ती शाळेला भेट
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २४ः सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेशमूर्ती कलाकार मूर्तींच्या अंतिम टप्प्यातील कामे करण्यात मग्न आहेत. त्यांच्या कामाची, कलेची माहिती जाणून घेण्यासाठी तळवणे शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी गावातील गणेशमूर्ती शाळेत जाऊन तेथील कलाकारांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी बनविलेल्या मूर्ती विषयी चर्चा करून त्याची माहिती घेतली. तळवणे क्रमांक १ ही उपक्रमशील शाळा असून, या शाळेतील विद्यार्थी बऱ्याच स्पर्धांमध्ये पारितोषिक विजेते ठरले आहेत. शाळेच्या क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत तेथील गणेशमूर्ती शाळांना भेट दिली. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी या गणेश मूर्तिकारांच्या कलेची प्रशंसा केली. यावेळी शाळेचे शिक्षक बापूशेट कोरगावकर, शिक्षिका मनिषा राऊत, युवराज गोसावी, शिवाजी कवडे व विद्यार्थी उपस्थित होते.
....................
swt2316.jpg
86556
आरोंदा ः मूर्तिकार गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत.

आरोंद्यात गणेशमूर्तीची
कामे अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २४ ः आरोंदा पंचक्रोशीतील सर्वच गणेशमूर्ती कलाकार अंतिम टप्प्यातील कामात व्यस्त आहेत. गणेश चतुर्थी हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनाला मोजकेच दिवस राहिल्याने गणेशमूर्ती शाळेत रात्रंदिवस कलाकार अंतिम टप्प्यातील काम करताना दिसत आहेत. गावात सात ते आठ गणेशमूर्ती शाळा असून सर्वच कलाकार मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. काही चित्रशाळांमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार हालत्या देखाव्यांची चित्रे साकारण्यात व्यस्त आहेत. गणेशभक्त पावसाच्या लहरीपणामुळे बाप्पाची मूर्ती लवकरात लवकर नेण्यासाठी सज्ज झाले आहेत. सगळीकडे सध्या गणेशोत्सवाची लगबग दिसून येत आहे.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com