गणेशोत्सवाचे चोख नियोजन करा
swt2328.jpg
86607
वैभववाडीः तहसील कार्यालयात शांतता समिती बैठकीस उपस्थित तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर आदी.
गणेशोत्सवाचे चोख नियोजन करा
तहसीलदार पाटीलः वैभववाडीत शातंता समितीची सभा
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २४ः गणेशोत्सवाला हजारो गणेशभक्त तालुक्यात दाखल होणार आहेत. त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये. उत्सव कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून उत्सवाला गालबोट लागणार नाही, याची सर्व दक्षता सर्व विभागांनी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी येथे केले.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने येथील तहसील कार्यालयात शांतता समितीची बैठक झाली. यावेळी नायब तहसीलदार दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर आदींसह सर्व विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते.
तहसीलदार पाटील म्हणाले, "गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे या उत्सवाला येणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, अशा पध्दतीने सर्व विभागांनी गणेशोत्सव कालावधीत नियोजन करावे. तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा परिषद मार्गावरील खड्डे बुजविणे, झाडी तोडणे ही कामे प्राधान्याने पूर्ण करा. दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी हटविण्याची यंत्रसामग्री तत्पर ठेवावी. वाहतुकीला अडचण होणार नाही, याची दक्षता दोन्ही विभागांनी घ्यावी. महावितरणने गणेशोत्सव कालावधीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी."
यावेळी वैभववाडी रेल्वे स्थानक, बस स्थानक व करूळ तपासणी नाका येथे गणेशभक्तांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडुन देण्यात आली. हे आरोग्य पथक २३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत कार्यरत असणार आहे. तीन रुग्णवाहिका असणार आहेत. गणपती विसर्जन मार्गावर विजेची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना देखील श्री. पाटील यांनी केली. तीन आसनी आणि सहा आसनी रिक्षाचालकांनी रेल्वे स्थानकात ठळकपणे दर प्रसिध्द करावेत, असे निर्देश दिले.
पोलिस निरीक्षक सोनवलकर यांनी वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगत पोलिस प्रशासनाने निश्चित केलेल्या पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करावीत, असे आवाहन केले.
चौकट
चार ठिकाणी पार्किंग सुविधा
गणेशोत्सव काळात शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी सहा ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यामध्ये अ. रा. विद्यालय, भाजप कार्यालय वैभववाडी, इनामदार प्लाझा, पेट्रोल पंप मच्छी मार्केटनजीक, तालुका स्कूलचा रस्ता अशा ठिकाणीच वाहने पार्किंग करावी, अशी सुचना सोनवलकर यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.