नागपूर, पुणेच्या स्पर्धकांनी मारली बाजी

नागपूर, पुणेच्या स्पर्धकांनी मारली बाजी

Published on

- rat२४p२०.jpg-
२५N८६७४०
राजापूर ः प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसमवेत कवी अनंत राऊत, वासुदेव तुळसणकर आणि मान्यवर.

वक्तृत्व स्पर्धेत नागपूर, पुण्याचे यश
अनिकेत, अनुष्का, प्रथमेश प्रथम ; २३ स्पर्धक सहभागी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्यावतीने २० व्या वर्षी आयोजित प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत नागपूर येथील अनिकेत रामा वनारे (संताजी महाविद्यालय, नागपूर), पुणे येथील अनुष्का यशवंत बिराजदार (सर परशुरामभाऊ महाविद्यालय) आणि प्रथमेश राहुल चव्हाण (बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे) यांनी प्रबोधनकार ठाकरे युवा वक्ता पुरस्कार पटकाविला.
ओणी येथील गुरुवर्य शहाजीराव खानविलकर सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर, प्रसिद्ध कवी अनंत राऊत आणि मान्यवरांच्या हस्ते विजेते-उपविजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्था कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, उपाध्यक्ष अरविंद गोसावी, कार्यवाह अ‍ॅड. गुरुदत्त खानविलकर, महादेव धुरे, शहाजीराव खानविलकर, चंद्रकांत बावकर, नारायण शेलार, गणपत जानस्कर, परीक्षक रवींद्र खैरे, रवींद्र राऊत, प्रशांत गुरव, नामदेव तुळसणकर, विवेक सावंत, शाळा समिती अध्यक्ष विजयकुमार वागळे, प्रज्ञा तुळसणकर, डॉ. शैलेश शिंदेदेसाई, अ‍ॅड. एकनाथ मोंडे, गणेश गांधी, मुख्याध्यापक विनोद मिरगुले आदी उपस्थित होते.
ओणी येथे झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी या ठिकाणांहून २३ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी होऊन त्यातून निवड झालेल्या स्पर्धकांची उत्स्फूर्त फेरीची स्पर्धा पार पडली. त्यामधून सर्वोत्कृष्ट तीन युवा वक्त्यांची निवड करण्यात आली. सानिया उदय यादव (कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, लांजा), बिल्वा गणेश रानडे (फाटक हायस्कूल, रत्नागिरी) आणि आदित्य ज्ञानेश्वर दराडे (माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, छत्रपती संभाजीनगर) हे स्पर्धेतील उपविजेते ठरले. विजेत्यांना ७ हजार ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तर, उपविजेत्यांना रोख रक्कम २ हजार रूपये, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com