देवरहाटीच्या जमिनी देवस्थानच्या नावे करा

देवरहाटीच्या जमिनी देवस्थानच्या नावे करा

Published on

-rat२४p३५.jpg-
२५N८६७७६
मंडणगड : तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्याकडे निवेदन देताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रतिनिधी.
----
‘त्या’ जमिनी देवस्थानच्या नावे करा
मंडणगड मंदिर विश्वस्त ; शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २४ ः देवस्थानच्या देवरहाटी जमिनीवरील महाराष्ट्र शासनाचे नाव कमी करून त्या तत्काळ देवस्थानाच्या नावे कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंडणगड तालुक्यातील मंदिर विश्वस्तांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नावे तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्याकडे निवेदन दिले.
महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदींचा भंग करून २०१८ नंतर देवरहाटीच्या जमिनीवरील देवस्थानाचा ताबा बेकायदेशीरपणे कमी करून त्या जागी महाराष्ट्र शासन असे नाव नोंद केले गेले आहे. याबद्दल जिल्ह्यातील देवस्थाने, भक्तगण, ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्ट यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वास्तविक कोणत्याही जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी दिवाणी न्यायालय असताना महसूल विभागाने देवरहाटी जमिनीचा मालकी हक्क बदलणे ही बेकायदेशीर, अवैध आहे. देवस्थानच्या जमिनीची बेकायदेशीर मालकी बदलण्याच्या प्रक्रियेने सर्वोच्च न्यायालय आणि विविध न्यायालय यांच्या निर्णयांचा हा अनादर आहे. महाराष्ट्र शासनाने देवरहाटीच्या जमिनीवरील शासनाचा हक्क कमी करून त्या पुन्हा देवस्थानाच्या नावे करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना पाट गावचे अशोक नटे, तुळशी येथील संतोष पोस्टूरे, पाचरळ येथील गजानन जंगम, मंदिर महासंघाचे दापोली संयोजक सुरेश रेवाळे, रमेश कडू, जिल्हा संघटक सुरेश शिंदे, हिंदू जनजागृती समितीचे परेश गुजराथी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com