-डिजिटल घटकांचा वापर करताना सतर्कता महत्त्वाची

-डिजिटल घटकांचा वापर करताना सतर्कता महत्त्वाची

Published on

- rat२७p८.jpg-
२५N८७४२१
गुहागर ः तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना राजेंद्र चव्हाण.

डिजिटल घटकांचा सतर्कतेने वापर करा
राजेंद्र चव्हाण ः पाटपन्हाळे महाविद्यालयामध्ये एकदिवसीय कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २७ : कोरोना काळापासून डिजिटल घटकांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचबरोबर फसवणुकीचे प्रमाणदेखील खूप वाढले आहे. त्यामुळे डिजिटल घटकांचा वापर करताना सतर्कता अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन एचडीएफसी बँक शृंगारतळीचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण यांनी केले.
तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे ‘बँकिंग क्षेत्रातील बदल’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. सध्याचे युग हे डिजिटल झालेले आहे. डिजिटल घटकांचा वापर करताना सर्वांनीच सावधानता बाळगून तसेच सतर्क राहून कसे व्यवहार करावेत अन्यथा मोठ्या प्रमाणात फसवणूक कशी होऊ शकते, या संदर्भात मार्गदर्शन केले. प्रामुख्याने मोबाइलचा वापर करताना ज्या ज्या वेळी आर्थिक व्यवहार होतात त्या वेळी आणि विविध लिंक मोबाईलवर ज्या वेळी येतात त्या वेळी कोणत्या गोष्टी करावयाच्या आणि कोणत्या टाळायच्या याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यापासून आपण कशाप्रकारे काळजी घ्यावयाची याचे सविस्तर विवेचन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. बँकिंग क्षेत्रामध्ये नवनवीन कोणकोणत्या गोष्टी आणि तंत्रज्ञान आले आहे याची सविस्तर माहिती देऊन यामध्ये प्रामुख्याने बँकिंगचे विविध ॲप, स्कॅनर, ऑनलाइन व्यवहार, डेबिट क्रेडिट कार्ड आणि मोबाईलवर येत असलेल्या विविध लिंक या विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. पी. ए. देसाई, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत, प्रा. कांचन कदम आणि प्रा. सुभाष घडशी व वाणिज्य शाखेतील प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता आंबेकर, प्रास्ताविक आनंदिता आग्रे आणि आभार ऋतुजा भेकरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com