इतिहास बदलून अभिमानाची ओळख कोकणकर
- rat२७p२.jpg -
KOP२५N८७४१५
मुंबई ः मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चाकरमानी न म्हणता कोकणकर म्हणावे, अशी मागणी करताना बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालम व अन्य.
----
चाकरमानी नको, आता ‘कोकणकर’ म्हणा...
अशोक वालम ः बळीराज सेनेने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २७ ः सत्तर-ऐंशीच्या दशकात कोकणवासीय कामधंद्यानिमित्त मुंबई, पुणेसारख्या मेट्रो शहरात उपजीविकेसाठी नोकरीनिमित्त स्थलांतरित झाले आहेत; मात्र त्यांची नाळही कोकणाशी कायम जोडलेली आहे. चाकरमानी म्हणजे स्वातंत्र्य गमावलेले, गावं सोडून न परतलेले, परावलंबी झालेले असा अर्थ असून अपमानित इतिहास आहे. त्यामुळे यापुढे स्वावलंबी उपजीविका, गावाशी नाळ जोडलेले, संस्कृतीचा रक्षणदार आणि अभिमानाची ओळख म्हणून यापुढे ‘कोकणकर’ असाच उल्लेख करावा असा आग्रह आहे, असे प्रतिपादन बळीराज सेना अध्यक्ष अशोक वालम यांनी केले आहे.
बळीराजा सेनेच्या माध्यमातून चाकरमानी न म्हणता कोकणकर म्हणावे, अशी मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजकल्याण विभागाला या संदर्भात दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा याविषयी चर्चेला उधाण आले आहे. कोकण हा निसर्गाच्या कुशीत विसावलेला, समुद्राच्या गाजेत हरवलेला आणि पावसाच्या सरीत न्हालेला एक स्वर्ग आहे; पण या स्वर्गात राहणारे अनेक कोकणकर मात्र स्वतःच्या भूमीतून दूर, शहरांच्या गर्दीत, उद्योगांच्या गर्दीत चाकरमानी जीवन जगत आहेत. रोजगारासाठी मुंबई, पुणे, ठाणेसारख्या महानगरांमध्ये स्थलांतर केलेल्या कोकणातील चाकरमानीवर्गामध्ये आता गावाकडे परतण्याची चाहूल दिसू लागली आहे. वाढती महानगरी गर्दी, महागाई, आणि ‘वर्क फ्रॉम होम’सारख्या नव्या संधीमुळे अनेक चाकरमानी कोकणात स्थायिक होण्याचा विचार करू लागले आहेत
आज अनेक तरुण चाकरमानी वर्क फ्रॉम होममुळे गावी राहू लागलेत. काहीजणांनी शेती, पर्यटन, बिझनेस यामध्ये नवे प्रयोग सुरू केले आहेत. ही एक सकारात्मक दिशा आहे; पण यासाठी धोरणात्मक मदतीची, आधुनिक तंत्रज्ञानाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक बदलाची गरज आहे. विशेषतः कोविड कालखंडानंतर ‘वर्क फ्रॉम होम’च्या संकल्पनेमुळे अनेकांनी कोकणात राहून नोकरी करण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे, शहरात काम आणि गावात घर हे नातं आता गावातच काम आणि घर या रूपात परिवर्तन पावत असल्याची नोंद सामाजिक अभ्यासक घेत आहेत.
कोट
चाकरमानी हा शब्द परंपरागत चालत आलेला आहे. त्याला वेगळा इतिहास आहे. कोकणकर कोकणवासीय की, रत्नागिरीकर म्हणायचं याला जीआर काढून उपयोगाचे नाही. यामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. प्रत्येक घराघरात तो शब्द पोहोचला पाहिजे.
- उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी
कोट
चाकरमानी की, कोकणकर हा प्रश्न कोकणातील प्रत्येक घराला भिडणारा आहे. रोजगाराच्या शोधात अनेक तरुण मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई येथे स्थायिक झाले; पण त्यांच्या मुळाशी असलेला कोकणप्रेमाचा धागा तुटलेला नाही. कोकण हा केवळ भूमी नाही तर ती एक संस्कृती, परंपरा आणि ओळख आहे. चाकरमानी ही परिस्थितीची गरज; पण मनानं प्रत्येकजण कोकणकरच आहे.
- गणेश पोस्टुरे, भट्टीवाडी मंडणगड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.