आव्हान झेलत भेंडीच्या झाडावरून तलावात उडी
-rat२७p१९.jpg-
P२५N८७४४५
रत्नागिरी ः श्रीदेव भैरी मंदिराच्या परिसरातील तळे.
-----------
टिळक आळी गणेशोत्सव शताब्दी ..............लोगो
आव्हान झेलत भेंडीच्या झाडावरून तलावात उडी
भागूबाईनी जिंकले १० रुपये ; ५० वर्षांपूर्वी महिलांच्या पोहोण्याच्या स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः येथील टिळक आळी गणेशोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण होत असताना आबालवृद्धांची मांदियाळी रत्नागिरीत आणि प्रामुख्याने टिळक आळीत जमा झाली आहे. टिळकांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या उत्सवाचे हे शंभरावे वर्ष असल्यामुळे त्याचे आगळे महत्व लक्षात घेऊन दीर्घकाळ उत्सवात सहभागी झालेले अनेक स्मरणीय आठवणी जागवत आहेत. भेंडीच्या झाडावरून तलावात उडी मारल्यामुळे एका महिलेने दहा रुपयाचे बक्षीस जिंकले ही एक खास आठवण.
शतकभराच्या उत्सवातील काही किस्से आहेत, काही परंपरा, शिकवण, उत्सवातील शिस्त आणि शिकवण सांगणाऱ्या आहेत. ज्याकाळी स्त्रिया तडफेने समाजात वावरत नव्हत्या, तेव्हाही स्त्रियांना पुढे आणण्याचे, त्यांना बळ देण्याचे कार्यक्रम उत्सवाच्या निमित्ताने कसे घेतले जात त्याची आठवण खास आहे. सुरुवातीला पोहण्याच्या स्पर्धा बंदिस्त जागेत विशेष करुन युरोपियन ऑफिसर्स क्लबच्या तलावात (सध्याचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय याच जागेत बांधलेले आहे!) होत असत. याच काळातील एक आठवण बापूसाहेव आगाशे यांनी सांगितली ती स्मरणीय आहे.
स्त्रिया आणि मुली यांना पोहण्याची कला आलीच पाहिजे यासाठी गोविंद विसाजी गोगटे प्रयत्नशील असत आणि त्यादृष्टीने पोहण्याच्या स्पर्धा होत असत. श्री देव भैरीच्या तलावात स्त्रियांच्या स्पर्धा झाल्यानंतर तलावाकाठच्या भेंडीच्या झाडावरुन उडी मारणाऱ्या व्यक्तिला दहा रुपयाचे बक्षीस एका उत्साही प्रेक्षकाने जाहीर केले आणि काय आश्चर्य, त्या वेळच्या विजयी स्पर्धक श्रीमती भागूबाई अवसरे यांनी भेंडीच्या झाडावरुन उडी मारुन ते बक्षीस मिळविले.
---
चौकट
काशिनाथ घाणेकरांच्या नाट्यकलेचे दर्शन
याच काळांत आठ बैलांच्या जोडीच्या गाडीतून श्रींची मिरवणूक काढली गेली होती. रंगभूमीवरील प्रसिद्ध दिवंगत कलाकार डॉ. काशिनाथ घाणेकर यांनीही टिळक आळी गणेशोत्सवाचे कार्यक्रमात आपल्या नाट्यकलेचे छोटेसे दर्शन घडविले होते. या पद्धतीने पुढे नावारूपाला आलेल्या अनेकांची पहिली पावले या उत्सवात पडली आहेत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते, या न्यायाने अनेकाचे पाय या उत्सवाच्या पाळण्यात दिसले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.