वराडकर हायस्कूलमध्ये संस्कृत दिन उत्साहात
swt2711.jpg
87450
कट्टा ः येथील वराडकर हायस्कुल मध्ये संस्कृत दिन साजरा करण्यात आला.
वराडकर हायस्कूलमध्ये
संस्कृत दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : संस्कृत भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने कट्टा येथील वराडकर हायस्कूलमध्ये संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यामध्ये संस्कृत भाषाविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्त प्रशालेत नववीच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिपाठ संस्कृत भाषेतून सादर केला. यात संस्कृत प्रार्थना, प्रतिज्ञा, संविधानाची प्रास्ताविका, सुविचार व बोधकथा यांचा समावेश होता. आपल्या दैनंदिन वापरात येणाऱ्या विविध वस्तू व त्यांची संस्कृतमधील नावे यांचे प्रदर्शन संस्कृत विभागामार्फत मांडण्यात आले.
या प्रदर्शनात विविध फळे, फुले, शेतीची अवजारे, प्राणी, पक्षी व त्यांची संस्कृत नावे मांडण्यात आली. या उपक्रमासाठी संस्कृत शिक्षक सिमरन चांदरकर, भूषण गावडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक व विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, सर्व संचालकांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.