श्री देव डोंब देवालय प्रवेशद्वाराचे उद्घाटन

श्री देव डोंब देवालय प्रवेशद्वाराचे उद्घाटन

Published on

श्री देव डोंब देवालय
प्रवेशद्वाराचे उद्‌घाटन
वेंगुर्लेः वायंगणी-डोंबवाडी येथील श्री देव डोंब या देवस्थानच्या ठिकाणी भाविक ज्ञानेश्वर कामत यांनी सदानंद कामत यांच्या सहकार्यातून साकारलेल्या श्री देव डोंब देवालय प्रवेशद्वाराचे उद्‌घाटन वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाविक ज्ञानेश्वर कामत व सदानंद कामत तसेच पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांचा श्री देव डोंब विकास मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी वायंगणी सरपंच दत्ताराम ऊर्फ अवी दुतोंडकर, श्री देव डोंब विकास मंडळाचे दीपक कोचरेकर यांच्यासह विकास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते.
------------------
आरती मराठी मासिकतर्फे
कथा-काव्य लेखन स्पर्धा
ओटवणेः प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आरती मराठी मासिकातर्फे कथा व काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजेत्यांच्या सर्व कविता व कथा आरती मासिकामध्ये प्रसिद्ध होणार आहेत. तसेच अन्य उत्कृष्ट कथा-कवितांनाही स्थान देण्यात येणार आहे. कथा स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर पुरस्कृत पारितोषिके जाहीर केली आहेत. प्रथम पारितोषिक १०००, द्वितीय ८००, तृतीय ६००, तर उत्तेजनार्थ प्रत्येकी ३०० रुपयांची तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. कविता स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ६००, द्वितीय ४०० रुपयांची दोन पारितोषिके, तृतीय २०० रुपयांची तीन पारितोषिके, तर उत्तेजनार्थ १०० रुपयांची तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. कथा स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी स्वलिखित कथा भरत गावडे, विजयदुर्गा अपार्टमेंट, ए विंग, फ्लॅट नं. ००१, भटवाडी, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग ४१६५१० या पत्त्यावर, तर काव्यलेखन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली कविता उषा परब, स्नेहांकुर बाग, सर्वोदय नगर, न्यू सालईवाडा, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग-४१६५१० या पत्त्यावर १५ सप्टेंबरपर्यंत पाठवाव्यात.
......
डाकघर सेवांची वेळ
एक तासाने वाढवली
सिंधुदुर्गनगरीः सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व कणकवली पोस्ट ऑफिसमधील रजिस्टर, स्पीड व पार्सल बुकिंग सेवांची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. या भागातील नागरिक, शासकीय-निमशासकीय कार्यालये, संस्था यांनी वाढीव वेळेत अधिकाधिक रजिस्टर, स्पीड व पार्सल बुकिंग करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाक अधीक्षक नंदकुमार कुरळपकर यांनी केले आहे. ग्राहकांची वाढती आवश्‍यकता लक्षात घेऊन वरील तीन मुख्य डाकघरांमध्ये या सेवांचा वेळ आता सकाळी ९ ते दुपारी ४ असा ठेवण्यात आला आहे.
---------------
कणकवली येथे
पेन्शन अदालत
कणकवलीः पंचायत समितीतर्फे तालुकास्तरीय पेन्शन अदालत ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित केली आहे. यात कर्मचाऱ्यांची निवृत्तिवेतनविषयक प्रकरणे व लाभांचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com