गोवळकोट रस्त्यावर पुन्हा खड्डे

गोवळकोट रस्त्यावर पुन्हा खड्डे

Published on

गोवळकोट रस्त्यावर पुन्हा खड्डे
नागरिक त्रस्त ; पालिकेला दोन दिवसाची मुदत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण,ता. २९ : शहरातील गोवळकोट रस्त्यावर पुन्हा खड्डे तयार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी या मार्गावरील खड्डे सिमेंटने भरण्यात आले होते; मात्र ते उखडल्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे तसेच अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे. या रस्त्यावर ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा युनिटी सोशल ग्रुपचे अध्यक्ष मुबारक शाह व सचिव मुन्ना जसनाईक यांनी नगरपालिकेला दिला आहे.
युनिटी सोशल ग्रुपचे शाह व जसनाईक यांनी नगरपालिकेला निवेदन दिले असून, दोन दिवसांची मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने गोवळकोट भागातील काही खड्डे घाईगडबडीने सिमेंट व खडी टाकून बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुसळधार पावसामुळे दोनच दिवसांत ते खड्डे पुन्हा उखडले. परिणामी, नागरिकांना पूर्वीइतकाच त्रास होत आहे. विशेष म्हणजे, या खड्ड्यांतूनच गणरायाचे आगमन झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तात्पुरत्या मलमपट्टीवर युनिटी सोशल ग्रुपकडूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला गोवळकोट रोड खड्डेमय अवस्थेतच राहिल्याने प्रशासनावर तीव्र टीका होत आहेत. या मार्गावरून एसटी बससह स्कूलबस व अन्य मालवाहू गाड्यांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे या रस्त्यावर तात्पुरती उपाययोजना न करता डांबरीकरणाद्वारे ठोस उपाययोजनेची गरज आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, त्यातील काही खड्डे विस्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे अधूनमधून अपघाताचे प्रकार घडत असल्याने नगर परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com