स्वराज्य संस्थेतर्फे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

स्वराज्य संस्थेतर्फे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

Published on

-rat२९p१३.jpg-
२५N८७९६४
रत्नागिरी : स्वराज्य संस्थेने जिल्हा प्रशासन सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. त्यांच्यासमवेत पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, प्राचार्य प्रा. डॉ. केतनकुमार चौधरी आदी.
----
अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
स्वराज्य संस्था; गौरवरत्नांचा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३०: येथील स्वराज्य संस्थेने गौरवरत्नांचा कार्यक्रमातून जिल्हा प्रशासन सेवेतील विविध विभागात कार्यरत अधिकारी, लिपिक, शिपाई, भूमापक, निमतानदार अशा २५ जणांचा गौरव केला. सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला शहर पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, प्राचार्य डॉ. केतनकुमार चौधरी, जयू भाटकर, नितीन मुजुमदार आणि माजी प्राचार्य साबळे उपस्थित होते. सन्मानित केलेल्यांमध्ये तहसील प्रशासनातील मंदार दामले, माधवी दाभाडे, अरविंद शिंदे, रमाकांत भातडे, अमोल पड्यार, रवींद्र खाके यांचा, जिल्हाधिकारी कार्यालयातील मृणाल दामले, वंदना भुते, निवेदिता गुरव यांचा समावेश होता. भूसंपादन विभागातील घनश्याम चवंडे, तलाठी कार्यालयातील नेहा कांबळे-मोहिते, भूमिअभिलेख कार्यालयातील सुशांत आंबुलकर, चैताली मोरे, मिनल वालम, नुअहत मुल्ला, देवाशिष सुवारे, साहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील अवधूत वायंगणकर, साहाय्यक जिल्हा निबंधक कार्यालयातील सतीश ढवळे, लांजा तलाठी कार्यालयातील संतोष हांदे, लांजा तहसील येथील संतोष पांचाळ, खेड तहसील येथील प्रवीण मोरे, देवरूख तहसील येथील महेश आठल्ये, विलास चव्हाण, खेड उपअधीक्षक भूमिअभिलेखामधील कृष्णत वेताळ यांना सन्मानित केले.
प्रास्ताविक जितेंद्र शिगवण यांनी केले. सूत्रसंचालन विभा कदम यांनी केले. या वेळी संजीव सुर्वे, ज्योती सुर्वे व जुवळे, अमृता मायनाक, सुशांत पवार, अभिषेक खंडागळे, सुवर्णा चौधरी, जितेंद्र शिगवण, रामदास चव्हाण, सुभाष आंग्रे, विलास बालगुडे, अमृता मायनाक, शेखर रेवणे, राहुल कडव, चंद्रकांत मांडवकर, सुनील ओरपे आदी मान्यवर उपस्थित होते.
----------
कोट
स्वराज्य संस्था या सेवाभावी कार्यात आज सर्वांना सहभागी होणे गरजेचे आहे. यापुढे या संस्थेने समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी समाजातील दोन होतकरू मुलांना युपीएससी, एमपीएससी करण्यासाठी आपण सर्व शिक्षणाची जबाबदारी उचलणार आहे.
- अभय तेली, शहर पोलिस उपनिरीक्षक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com