गणेशोत्सवात विजेचा खेळखंड़ोबा
swt305.jpg
88167
सातार्डा ः विद्युतभारित तारांना स्पर्श करणारी झाडे आणि फांद्या.
गणेशोत्सवात विजेचा खेळखंडोबा
नागरिकांमध्ये संताप; सातार्डा, तरचावाडा, केरकरवाड्यास फटका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणातही तालुक्यातील सातार्डा, तरचावाडा आणि केरकरवाडा येथील रहिवाशांना वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला आहे. या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होणे आणि कमी दाबाने येणे यामुळे नागरिकांना, विशेषतः गणेशभक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री (ता. २७) सातार्डा, साटेली आणि मळेवाड भागामध्ये वीज खंडित झाली. तब्बल १५ तासांनी म्हणजेच दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला; मात्र तो कमी दाबानेच येत असल्याने पिण्याच्या पाण्याचे पंप चालू होऊ शकले नाहीत. यामुळे परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस सुरू असतानाही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
झाडांच्या फांद्या आणि वेलींनी वेढलेल्या विद्युतभारित वाहिन्या हेच या समस्येचे मूळ कारण असल्याचे सांगितले जात आहे. आमदार दीपक केसरकर यांनी गणेशोत्सवापूर्वी अखंडित वीजपुरवठा राखण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक साहित्य आणि वाहने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वखर्चाने मदत करण्याची तयारीही दर्शवली होती; मात्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवापूर्वी वीजवाहिन्यांची तपासणी आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक असतानाही हे काम झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निष्काळजीपणामुळे गणेशभक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.