गुहागरची गणेशमूर्ती सातासमुद्रापार

गुहागरची गणेशमूर्ती सातासमुद्रापार

Published on

-rat३०p१७.jpg-
२५N८८१८९
गुहागर ः खालचापाट येथील मूर्तिकार मंगेश घोरपडे यांच्याकडून गणेशमूर्ती स्वीकारताना निखिल रेवाळे.
----
गुहागरची गणेशमूर्ती सातासमुद्रापार
युरोपमध्ये गणेशोत्सव ; गावातील उत्सवाची आठवण येतेच
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ३० : देशभर साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातही धुमधडाक्यात साजरा केला जातो. युरोपमध्ये असलेल्या राज्यातील तरुण-तरुणी सलग तिसऱ्या वर्षी गणेशोत्सव साजरा करत आहेत. या उत्सवासाठी गुहागरातून गणेशमूर्ती युरोपमध्ये नेण्यात आली आहे. पुढील काही दिवस ही मंडळी आपले काम सांभाळून दररोज आरती, महाप्रसाद असे कार्यक्रम करणार आहेत.
महाराष्ट्रामधील मराठमोळे युवक युरोपमधील स्लोवाकिया या देशात नित्रा शहर येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे, परंपरेचे जतन परदेशात होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सर्व तरुणमंडळी महाराष्ट्रातील आहेत. तालुक्यातील निखिल सुनील रेवाळे हा तरुणही जॅग्वार लँड रोवर या जगप्रसिद्ध कंपनीत कामाला आहे. यावर्षी गणेशोत्सवासाठी आपल्या गुहागरातील गणेशमूर्ती असावी म्हणून काही दिवसांपूर्वी आपल्या घरी आला होता. गुहागर खालचापाट येथील मूर्तिकार मंगेश घोरपडे यांच्याकडून आकर्षक मूर्ती बनवून घेतली. १९ ऑगस्टला या मूर्तीला चांगले पॅकिंग करून आपल्यासोबत युरोपमध्ये घेऊन गेला आहे. निखिल हा खास गणेशमूर्ती आणण्यासाठी इतक्या दूरहून आपल्या गावी आला होता. गणेशोत्सवात प्रत्येकजण आपली कामे सांभाळून गणेशाची सेवा करणार आहेत. आम्ही त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करत असलो तरी आपल्या गावातील गणेशोत्सवाची जास्त आठवण येत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com