कोळंबला शॉर्टसर्किटने
धावती मोटार पेटली

कोळंबला शॉर्टसर्किटने धावती मोटार पेटली

Published on

कोळंबला शॉर्टसर्किटने
धावती मोटार पेटली
मालवण, ता. ३० ः धावत्या मोटारीत अचानकपणे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी कोळंब येथे घडली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने चालकासह गाडीतील कोणीही जखमी झाले नाही. मोटारीच्या इंजिनच्या भागातून आगीचा धूर येऊ लागल्याने चालकाने गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करत बाजूला जाणे पसंत केले. गाडीला आग लागल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून आल्याने त्यांनी तत्काळ पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. या गाडीमध्ये आग नेमकी कशामुळे लागली, हे मात्र समजू शकले नव्हते.

देवगडमध्ये आज
दाखल्यांचे वितरण
देवगड, ता. ३० ः भाजप भटके-विमुक्त आघाडी देवगड तालुकाध्यक्ष संतोष साळस्कर यांच्यातर्फे उद्या (ता. ३१) भटके-विमुक्त दिनाचे औचित्य साधून भटके-विमुक्त जाती-जमातीमधील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वितरण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी साळसकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मालवण धुरीवाड्यातील
हायमास्ट प्रकाशमान
मालवण, ता. ३० ः मालवण शहर, धुरीवाडा कुरण येथील हायमास्ट गेले काही दिवस बंद होता. त्यामुळे मच्छीमार व व्यावसायिकांना अडचणी निर्माण होत होत्या. गणेशोत्सव लक्षात घेता हा हायमास्ट टॉवर दुरुस्ती करून सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. याबाबत माहिती मिळताच शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी हायमास्ट प्रकाशमान करून दिला. यावेळी आबा शिर्सेकर, शिवाजी केळुसकर, वसंत गावकर, बाबू धुरी, तुळशीदास गोवेकर, दत्ता केळुसकर, एकनाथ मोहिते, मिथुन मणचेकर, दादू शिर्सेकर, पवन शिर्सेकर, संदीप धुरी व धुरीवाडा येथील मच्छीमार, नागरिकांनी पाटकर यांचे आभार मानले.

योगासन स्पर्धेमध्ये
निकिता लाडचे यश
कणकवली, ता. ३० ः चंद्रपूर आनंदवन-वरोरा येथे नुकतीच राज्यस्तरीय योगासन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निकिता लाड हिने बॅकहॅंड इंडिव्हिजव्हल आणि लेग बॅलन्स इंडिव्हिजव्हल या प्रकारात राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला. चंद्रपूर येथे सहावी महाराष्ट्र स्टेट योगासन स्पोर्टस् चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत निकिता हिने नेत्रदीपक कामगिरी केली. या यशाबद्दल तिचे योगासन असोसिएशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षा डॉ. वसुधा मोरे, सचिव डॉ. तुळशीराम रावराणे व सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

‘हरकुळ खुर्द उत्कर्ष’तर्फे
गणेशभक्तांसाठी बस सेवा
कणकवली, ता. ३० ः गणेशभक्तांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या हरकुळ खुर्द ग्राम उत्कर्ष मंडळ, मुंबई यांच्यातर्फे आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन गायकवाड यांच्या पुढाकाराने गेली कित्येक वर्षे डोंबिवली-हरकुळ खुर्द-कणकवली एसटी बस बुकिंग करून गणेशभक्तांना अल्प दरात मूळ गावी पोहोचविण्याचे काम करत असतात. त्याच पद्धतीने याही वर्षी २४ ऑगस्टला दुपारी ४ वाजता द्वारका हॉटेल डोंबिवली (प.) येथून बस सोडण्यात आल्या. गायकवाड यांची मेहनत व मंडळाचे सचिव तुकाराम रासम, डॉ. राजाराम दळवी, दिलीप रासम, राजेंद्र रासम, बाबाजी दळवी, प्रमोद रासम यांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळेच गेली अनेक वर्षे ही सेवा गणेशभक्तांसाठी लाभदायक ठरत आहे. या प्रसंगी मान्यवरांनी भक्तांच्या सोयीकरिता गावी पोहोचेपर्यंत सर्वांना पाणी, दोन वेळचा चहा व सर्वांना सुबक आरतीसंग्रह आवृत्ती वितरण करून आई पावणादेवीच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com