टेरव तंटामुक्त समितीच्या 
अध्यक्षपदी परशुराम फागे

टेरव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी परशुराम फागे

Published on

-ratchl२९३.jpg ः

चिपळूण : परशुराम फागे यांचा सत्कार करताना अनंत कराडकर, एकनाथ माळी, सुहास मोहिते, महेंद्र खांबे आदी.

टेरव तंटामुक्त समितीच्या
अध्यक्षपदी परशुराम फागे
चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे झालेल्या ग्रामसभेत परशुराम फागे यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल टेरव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. टेरव ग्रामपंचायत निवडणूक नेहमीच चुरशीची ठरते. निवडीनंतर अनंत कराकर, एकनाथ माळी, रामचंद्र शिरकर, पोलिसपाटील सुहास मोहिते, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र खांबे आदींनी फागे यांचा सत्कार केला.

कुणबी भवन येथे आरोग्य तपासणी शिबिर
मंडणगड ः मंडणगड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाचे औचित्य साधून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुणबी भवन येथे आरोग्य शिबिर झाले. या वेळी डॉ. शुभम ठाकूर, अधिपरिचारक विशाल लोखंडे, समुपदेशक रमेश गोरे, महालॅबच्या सोनल मर्चंडे, कक्षसेवक विक्रांत नागेश, वाहनचालक मयूर जाधव यांनी दिवसभर थांबून गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यात रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासण्या करण्यात आल्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी विजय ऐनेकर, रघुनाथ पोस्टुरे व सर्व कार्यकर्त्यांनी शिबिरास सहकार्य केले.

हर्णै ‘तंटामुक्त’चे पावसे अध्यक्ष
दापोली ः हर्णै ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सोमनाथ पावसे, तर सचिव म्हणून दिनेश मोहिते यांची निवड करण्यात आली. गावातील काही ज्येष्ठ व सुजाण नागरिक सदस्य म्हणून या समितीत सहभागी झाले आहेत.


सजावट स्पर्धेचे युवा प्रेरणा कट्टातर्फे आयोजन
दापोली ः येथील (कै.) कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टामार्फत ऑनलाईन बाप्पा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मूर्ती आणि सजावट दोन्हीही इकोफ्रेंडली असावे आणि सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू भारतीय बनावटीच्याच असाव्यात, असे आयोजकांनी स्पष्ट नमूद केले आहे. स्पर्धेत भाग घेताना २ फोटो आणि थोडक्यात माहिती अपलोड करावयाची आहे त्यासाठी https://mahajantrust.in/ganpati-contest या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत २ सप्टेंबरपर्यंत स्पर्धेत सहभाग नोंदवू शकतात. त्यानंतर परीक्षक परीक्षण करून क्रमांक देणार असल्याची माहिती संयोजक श्वेता बापट दाबके यांनी दिली.

प्रतिभावंतांचा कलाविष्कार एकाच मंचावर
साडवली ः रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकारांना एकाच रंगमंचावर आणण्याचे काम धम्मक्रांती कलामंच रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. याचेच फलित म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराने समृद्ध अशा बहुआयामी प्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या चार कलाविष्कारांचे सादरीकरण एका रंगमंचावर होणार आहे. हा कार्यक्रम संगमेश्वर तालुक्यातील लोवले शुभगंधा सभागृहात १४ सप्टेंबरला होणार आहे. धम्मक्रांती ऑर्केस्ट्रा, धम्मक्रांती गायन पार्टी, धम्मक्रांती कराओके, धम्मक्रांती स्वरगुंजन या माध्यमातून जिल्ह्यातील नामवंत दिग्गज कलाकार कलाविष्कार सादर करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com