ऐश्वर्या जाधव सेट परीक्षेत यशस्वी
-rat१p३.jpg-
P२५N८८६१६
देवरूख ः ऐश्वर्याचे अभिनंदन करताना वडील कृष्णा जाधव, आई पल्लवी आणि बहीण प्राजक्ता.
-----
ऐश्वर्या जाधव सेट परीक्षेत यशस्वी
साडवली, ता. १ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित साहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर झाला. यामध्ये आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या ऐश्वर्या कृष्णा जाधव या साहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी सेट (राज्य पात्रता परीक्षा) उत्तम गुणांनी यशस्वी झाल्या आहेत. ऐश्वर्या जाधव यांनी भौतिकशास्त्र (फिजिकल सायन्स) या विषयातून परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ऐश्वर्या यांनी गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामधून १२वी विज्ञान शाखेचे शिक्षण प्रथम श्रेणीतून पूर्ण केल्यावर, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून बी. एस्सी. पदवी सन २०२३ मध्ये ९.८७ सीजीपीए मध्ये, तर एमएस्सी पदव्युत्तर पदवी सन २०२५ मध्ये ९.९८ सीजीपीएमध्ये उत्तीर्ण केली आहे. ऐश्वर्या जाधव यांचे वडील कृष्णा लक्ष्मण जाधव हे रत्नागिरी पोलिस मुख्यालयात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत, तर आई पल्लवी जाधव या गृहिणी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.