गणेशोत्सवात कोरेचा प्रवाशांना दिलासा
- rat२p७.jpg-
२५N८८८८२
कोकण रेल्वे
---
गणोशोत्सवात ‘कोकण रेल्वे’चा प्रवाशांना दिलासा
प्रशासनाकडून जादा गाड्यांचे सुयोग्य नियोजन ; कोकणचे दिसले प्रतिबिंब
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा गणेशोत्सवासाठी केलेल्या विशेष नियोजनामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. कोकण रेल्वेत कोकणचे प्रतिबिंब दिसून आले. मुंबईसह पुण्यातून येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय झाली.
कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव म्हणजे केवळ सण नव्हे, तर तो एक उत्सव आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना पुरेपूर आनंद देण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांच्या समाधानासाठी वेगवेगळे उपक्रम ही हाती घेण्यात आले होते. कोकणातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला. परंतु कोकणवासीयांसाठी हक्काच्या गाड्या अगदी मोजक्या आहेत. मुंबईतून गोवा, कर्नाटक, केरळकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये कोकणातील चाकरमान्याना स्थान मिळते. खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या प्रमुख रेल्वे स्थानकांवर थांबत होत्या. रेल्वे प्रशासनाने ३८० हुन विशेष रेल्वे फेऱ्या चालवून एक नवा आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे यातील बहुतांश गाड्या कोकण-मर्यादित होत्या. त्यांना खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडी मर्यादित थांबे होते. त्यामुळे परराज्यातील प्रवाशांची गर्दी या गाड्यांमध्ये नव्हती त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार ही रोखला गेला.
रेल्वे प्रशासनाने बहुतांश गाड्या ह्या तळकोकणापर्यंत म्हणजेच सावंतवाडीपर्यंत चालवल्या. कोकणवासी चाकरमान्यांना कोकणातील प्रत्येक तालुक्यातील भागात जाण्यासाठी रेल्वेची सोय मिळाली. स्थानक परिसरात विशेष सेल्फी पॉइंट्स, आकर्षक विद्युत रोषणाई, कलात्मक रांगोळी आणि पूजा साहित्य स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामुळे स्थानकांवर गणेशोत्सवाचे चैतन्य ओसंडून वाहत आहे. अनेकांना रोजगार मिळावा यासाठी तात्पुरती स्टॉल ही उपलब्ध करून देण्यात आले होते. कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने लाखो चाकरमानी दाखल झाले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ५००० हून अधिक एसटी चाकरमान्यांना घेऊन कोकणात दाखल झाल्या. एसटी आणि कोकण रेल्वेचे नियोजन यावर्षी यशस्वी झाले. त्यामुळे कोकणात आलेले चाकरमानी आनंदी होते.
चौकट
चोरीच्या प्रकारावर आळा
कोकण रेल्वे मार्गावर चोरीचे प्रकार घडू नये यासाठी आरपीएफने बंदोबस्त ठेवला होता गोवा, कर्नाटक येथून जादा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. तब्बल सव्वाशे पोलीस कर्मचारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्थानकावर सेवा देत होते. त्यामुळे चोरीचे प्रकार झाले नाही.
------
कोट
दादर ते सावंतवाडी ‘तुतारी एक्स्प्रेस’ला अजूनही जुनेच डबे आहेत. परंतु अधिक सुरक्षित आणि आरामदायक असलेल्या एलएचबी कोच या गाडीला द्यावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत. रेल्वे प्रशासनाने २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये ती गाडी अपग्रेड करण्याची घोषणा केली असली तरीही त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. यंदा सर्व गणेशोत्सवातील विशेष गाड्यांना जुनेच डबे आहेत.
- अक्षय म्हापदी, सचिव कोकण रेल्वे प्रवासी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.