गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
swt46.jpg
89442
कुडाळ ः श्रीरामवाडी येथील साई तळवणेकर यांनी केलेल्या सजावटीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
swt47.jpg
89443
द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या कुडाळेश्वरवाडी येथील सत्यवान राऊळ यांनी केलेली सजावट
swt48.jpg
89444
तृतीय क्रमांक लक्ष्मीवाडी येथील तुषार आजगावकर यांच्या सजावटीस मिळाला.
गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
कुडाळात शिंदे शिवसेनेतर्फे आयोजन; श्रीरामवाडी येथील साई तळवणेकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ः आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या स्पर्धेत अनुक्रमे श्रीरामवाडी येथील साई तळवणेकर, कुडाळेश्वरवाडी येथील सत्यवान राऊळ, लक्ष्मीवाडी येथील तुषार आजगावकर यांनी तर उत्तेजनार्थ क्रमांक श्रीरामवाडी येथील विघ्नेश पाटील यांनी पटकावला.
या स्पर्धेत शहरातील एकूण ९१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये १७ वॉर्डनिहाय व संपूर्ण शहरातून विजेत्यांची निवड करण्यात आली. परीक्षणाचे काम महेश राऊळ व रजनीकांत कदम यांनी केले. वॉर्डनिहाय निकाल असा ः वॉर्ड १ (कविलकाटे) : प्रथम निलेश जळवी, वॉर्ड २ (भैरववाडी) : प्रथम अरविंद मेस्त्री, वॉर्ड ३ (लक्ष्मीवाडी) : प्रथम तुषार आजगावकर, वॉर्ड ४ (बाजारपेठ पान बाजार) : प्रथम सचिन सावंत, वॉर्ड ५ (कुडाळेश्वरवाडी) : प्रथम सत्यवान राऊळ, वॉर्ड ६ (बाजारपेठ माठेवाडा) : प्रथम ओंकार शिरसाट, वॉर्ड ७ (डॉ. आंबेडकर नगर, भोसलेवाडी, माठेवाडा) : प्रथम दाजी कुडाळकर, वॉर्ड ८ (तुपटवाडी मज्जिद मोहल्ला) : प्रथम गोविंद सावंत, वॉर्ड ९ (नाबरवाडी) : प्रथम तन्मय कुणकावळेकर, वॉर्ड १० (केळबाईवाडी) : प्रथम संतोष खटावकर, वॉर्ड ११ (वाघसावंत टेंब, गणेश नगर) : प्रथम प्रतीक सावंत, वॉर्ड १२ (हिंदू कॉलनी) : प्रथम गजानन कुडाळकर, वॉर्ड १३ (श्रीरामवाडी) : प्रथम साई तळवणेकर, वॉर्ड १४ (अभिनव नगर) : प्रथम स्वरूप पडते, वॉर्ड १५ (कुंभारवाडी) : प्रथम विशाल कुंभार, वॉर्ड १६ (एमआयडीसी, कुंभारवाडी) : प्रथम महेश कुंभार, वॉर्ड १७ (सांग्रिडेवाडी) : प्रथम डॉ. राजन राणे. संपूर्ण शहरातून ठरलेले विजेते : प्रथम – साई तळवणेकर (श्रीरामवाडी), द्वितीय – सत्यवान राऊळ (कुडाळेश्वरवाडी), तृतीय – तुषार आजगावकर (लक्ष्मीवाडी), उत्तेजनार्थ – विघ्नेश पाटील (श्रीरामवाडी). या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा लवकरच सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात पार पडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.