७० पार केलेल्या ५ कलाकारांच्या परिश्रमाचे मंदिर

७० पार केलेल्या ५ कलाकारांच्या परिश्रमाचे मंदिर

Published on

(टुडे १ साठी, फ्लायर)

दखल--------लोगो

-rat४p२७.jpg-
P२५N८९४६२
रत्नागिरी ः टिळक आळी पारावरच्या गणपतीचे सुवर्ण मंदिर.
----
रत्नागितील टिळक आळी पारावरच्या गणपती उत्सवातील सुवर्ण मंदिर म्हणजे देखणे जे हात ज्यांना या पंक्तीची प्रत्यक्ष अनुभूती आहे. विशेष म्हणजे हे हात ६५ ते ७८ वयोगटातील पाच कलाकारांचे आहेत. दिवसाला सुमारे १२ तास असे सात महिन्यांहून थोडा अधिक वेळ लागला. चिकाटी, परिश्रम, संयम, कौशल्य, प्रयोगशीलता लगेच जाणवते.

- शिरिष दामले, रत्नागिरी
---

सत्तरी पार केलेल्या पाच कलाकारांच्या परिश्रमाचे मंदिर
‘श्री’ विराजले सुवर्ण मंदिरी ; २,५२० तासांची साधना, १८ हजार नाण्यांचा वापर

पर्यावरणस्नेही आठ फूट उंच, सहा फूट रूंद, सहा फूट लांब अशा आकाराच्या षट्कोनी मंदिराची प्रतिकृती यावर्षी बनवण्यात आली. याची मूळ संकल्पना प्रकाश कुलकर्णी यांची. ती प्रत्यक्षात येण्यासाठी नेमकेपणाने सांगायचे झाले तर ७८ वर्षाचे प्रकाश कुलकर्णी, ७५चे विलास कुलकर्णी, ७२ला पोचलेले विजय नितोरे आणि ६५च्या पलीकडे गेलेले मनोहर केळकर यांचे हात अन् डोकी दिवसातील आठ आठ तास चालत होती. दुपारी बारापासून सुरू झालेले काम संध्याकाळी सातपर्यंत चालायचे. त्यानंतर पुन्हा रात्री साडेआठला सुरुवात ते दोन वाजेपर्यंत. पाच रुपयांची चकाकणारी सुवर्णासारखी भासणारी १८ हजार नाणी यांसह एक रुपयाची तीन हजार नाणी वापरली.
डिसेंबर महिन्यात त्याचे डिझाईननुसार लोखंडी सळ्यांनी सांगाडा कुलकर्णी आदींच्या देखरेखीखाली करून घेतला. त्यावर अॅल्युमिनियमचा पत्रा बसवला. त्यावर नाणी अन् दिमाखदार १३ हंस. त्याचे कोरीव काम याच मंडळींचे. पीओ फॉर्मचे हंस त्यावर मीना काम हे सारे टप्प्याटप्प्याने होत होते. षट्कोनी आकाराचे मंदिर असले तरी ते पाच खांबांवर उभे करावे लागले. कारण, सहाव्या कोनाला दर्शनी भागात पायऱ्या कराव्या लागल्या. नाणी चिकटवण्यासाठी व्हाईट फेविकॉल; पण त्याच्यावर वातावरणाचा परिणाम होत होता. दरम्यान, मेमध्ये अवकाळी पाऊस झाला. काही काळाने नाणे गळून पडायचे, असे लक्षात आले. त्यासाठी लागणारा वेगवेगळा वेळ याचा अदमास घेऊन या साऱ्या मंडळींनी काम केले. हे मंदिर कोणत्याही इतर मंदिराची ती प्रतिकृती नाही. विद्युत रोषणाईने ते अधिक चकाकणारे बनवणारे भूषण काळे आणि त्यांचे सहकारी यांचा सहभाग मोलाचा. चौसष्ट कलांचा अधिपती यांच्यावर सदा प्रसन्न राहो.
---
चौकट
सावंतवाडीतील मुले थक्क
मंदिराचे काम करत असताना नाणी बसवून झाली होती. त्या दरम्यान सावंतवाडीतील मुले ट्रिपने रत्नागिरीत आली. ती या देवळात शिरली आणि त्यांनी या मंदिराच्या चाललेल्या कामाचे जणू प्रात्यक्षिक पाहिले. ती सारी मुले अचंबित झाली. तुम्ही अशी काही मखरे बनवता का? तुमचा कारखाना आहे का? किंवा तुम्ही मखरे करून देता का? अशी विचारणा त्या मुलांनी केली. त्या मुलांच्या कौतुकाने आपल्या हातून काहीतरी चांगले घडते आहे हे तेव्हाच जाणवले होते, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
---
चौकट
कलाकुसरीच्या कामात कसोटी
सांगाड्यापासून नाणी चिकटवण्यापर्यंतच्या कामाला सुमारे तीन महिने लागले. त्यानंतर अतिशय नाजूक आणि कलाकुसरीचे मीना काम सुरू झाले. खडे, टिकल्या, कुंदन, मणी, गोंडे, लटकन, लोलन बसवणे यासाठी प्रचंड संयम आणि चिकाटी आवश्यक होती. एकेक फूल बनवायला चार तास लागत. अशी वेगवेगळ्या आकाराची ४०० फुले या ५ जणांनी बनवलेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com