परप्रांतीय ट्रॉलर्सवर कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा
परप्रांतीय ट्रॉलर्सवर कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : परराज्यातील ट्रॉलर्सद्वारे होणारी बेकायदेशीर मासेमारी त्वरित थांबवावी; अन्यथा १५ सप्टेंबरला समुद्रात उपोषणाला बसू, असा इशारा बंदर जेटी येथील रहिवासी दामोदर तोडणकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवले असून यात स्थानिक मच्छीमारांचे आर्थिक नुकसान आणि पारंपरिक व्यवसायावर होत असलेल्या परिणामांकडे लक्ष वेधले आहे.
१ ऑगस्टपासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाला असला तरी, मालवणमधील स्थानिक मच्छीमार अजूनही पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरू करू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत परराज्यातून आलेल्या शेकडो ट्रॉलर्सनी मालवणच्या समुद्रसीमेत घुसखोरी करून मोठ्या प्रमाणात मासळीची बेकायदेशीर लूट सुरू केली आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उपजीविकेवरही थेट परिणाम होत आहे.
तोडणकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, या बेकायदेशीर मासेमारीची माहिती वेळोवेळी मत्स्यव्यवसाय विभागाला दिली आहे, तरीही अद्याप अत्याधुनिक गस्तीनौका उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे या परप्रांतीय ट्रॉलर्सना रोखण्यात प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरत आहे. जर ही घुसखोरी रोखता येत नसेल, तर प्रशासनाने तसे स्पष्ट करावे, पण डोळ्यासमोर होणारी मासळीची ही लूट सहन केली जाणार नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
तोडणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने मालवण किनारपट्टीवर त्वरित गस्त वाढवून कारवाई करावी. परराज्यांतून येणाऱ्या बेकायदेशीर ट्रॉलर्सना कायमस्वरूपी थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारावी. स्थानिक मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा मागण्या केल्या आहेत. या मागण्यांवर १४ ऑगस्टपर्यंत कार्यवाही न झाल्यास १५ सप्टेंबरपासून भर समुद्रात उपोषणाला बसण्याचा इशारा श्री. तोडणकर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.