मुळीक कुटुंबाचा ''मोठ्या घरचा राजा''

मुळीक कुटुंबाचा ''मोठ्या घरचा राजा''

Published on

swt416.jpg
N89548
कोंडुरे ः येथील मुळीक कुटुंबाचा ‘मोठ्या घरचा राजा’.

मुळीक कुटुंबाचा
‘मोठ्या घरचा राजा’
आरोंदा, ता. ४ ः कोकणात गणेशोत्सव सण हा प्रत्येक घराघरात उत्साहाने साजरा होतो. परंतु, कोंडुरे (ता. सावंतवाडी) येथील मुळीक कुटुंबाने तब्बल पाचशे वर्षांपासून ''मोठ्या घरचा राजा'' ही पारंपरिक परंपरा अखंडपणे जपली आहे.
या कुटुंबातील सर्व सदस्य गणेशोत्सवाच्या काळात एकत्र येऊन श्रींचे पूजन, आरती, भजन, महाप्रसाद आणि पारंपरिक फुगड्या यांसारखे कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरे करतात. त्यामुळे कोंडुरे देऊळवाडी परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघतो. मुळीक कुटुंबातील एकूण नऊ घराणी ''मोठ्या घरचा राजा'' सोबतच आपापल्या घरात श्रींची प्रतिष्ठापना करून पूजन करतात. त्यामुळे देऊळवाडीत जणू अष्टविनायक दर्शनाचा अनुभव भाविकांना मिळतो. गावात सर्वत्र एकोप्याचे दर्शन घडते. येथे श्री ब्राह्मण देवाचे सुंदर मंदिर असून, त्याच्या चहूबाजूंनी निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. परंपरा, भक्ती आणि एकोप्याचा संगम या गणेशोत्सवात आजही तितकाच अनुभवता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com