ःकोसुंबचे सुपुत्र एपीआय राकेश जाधव यांनी चमकदार कामगिरी
rat५p९.jpg -
२५N८९६४९
देवरूख ः उत्कृष्ट कामगिरीसाठी राकेश जाधव यांचा पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष सन्मान केला.
----
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून
कोसुंबचे राकेश जाधव यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ५ ः संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावचे सुपुत्र राकेश शशिकांत जाधव सध्या कोंढवा पोलिस ठाणे पुणे शहर येथे साहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) म्हणून कार्यरत आहेत. पोलिसदलातील चमकदार कामगिरीच्या आधारावर उत्तम सेवा सुरू आहे. कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राकेश जाधव यांचा समावेश असलेल्या पथकाला सन्मानचिन्ह देऊन गौरवले. या अगोदर विविधांगी उत्कृष्ट कामगिरीसाठी राकेश जाधव यांचा पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष सन्मान केला आहे.
जाधव यांनी अलीकडेच पुणे येथे घडलेल्या बहुचर्चित अत्याचार प्रकरणाचा जलदगतीने व कौशल्यपूर्ण तपासाद्वारे २४ तासात सत्य घटनेचा उलगडा केला. हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलिस आयुक्तांनी सन्मानित केले. पाकीटमारी, चोऱ्या तसेच दरोडे, घरगुती हिंसाचार, वाहनचोरी, आर्थिक फसवणूक, शस्त्रास्त्र तस्करी, पूर्ववैमनस्यातून खुनाचा प्रयत्न, अशांतता व दहशतविरोधी कारवाई, कोयता गँग प्रकरण, स्त्रियांवरील छेडछाड व अत्याचार अशा प्रकारच्या विविध गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांना शिक्षा व पीडितांना त्यांनी योग्य न्याय मिळवून दिला आहे.
जाधव कोसुंबचे प्रतिष्ठित नागरिक भारती व शशिकांत बापूजी जाधव यांचे कनिष्ठ सुपुत्र. शशिकांत जाधव यांच्या एसटीतील नोकरीमुळे राकेश जाधव यांचे बालपण कोसुंब येथे गेले. राकेश यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा कोसुंब येथे तर माध्यमिक शिक्षण शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब येथे झाले. त्यानंतर आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून बीए पदवी संपादन केली. २००३ मध्ये त्यांनी रत्नागिरी पोलिसदलातील सेवेस प्रारंभ केला. २०१२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा १४३व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.