क्राईम

क्राईम

Published on

‘सप्तलिंगी’त बुडणाऱ्या
दोघांना जीवदान
देवरूख ः देवरूख शहरातील सप्तलिंगी नदीपात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना बुडत असताना वाचवण्यात आले. तरुणाच्या सहकाऱ्यांनी धाडसाने दोघांना वाचवले. ही घटना बुधवारी सायंकाळी उशिरा घडली. दोन्ही तरुणांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहर परिसरातील गणपतींचे मोठ्या प्रमाणात सप्तलिंगी नदीपात्राच्या मच्छीमार्केट परिसरामध्ये विसर्जन होत असते. विसर्जन केलेले गणपती झाडाझुडूपांमध्ये कडेला अडकलेले असतात. हे गणपती दुसऱ्या दिवशी खालच्याआळी येथील तरुण एकत्र येऊन पुन्हा पाण्यात विसर्जन करण्याचे काम करतात. बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खालची आळी येथील तरुण नदीपात्रात उतरून अडकलेले जाळीतील गणपती सोडवण्याचे काम करत होते. एवढ्यातच पाण्याचा मोठा लोंढा आल्यामुळे आशय बारटक्के हा तरुण पट्टीचा पोहणारा असतानाही पाण्यात बुडू लागला. ही बाब सुवारे या तरुणाच्या लक्षात येताच त्याने आशय बारटक्केला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र बारटक्के याने सुवारे याला मिठी मारल्यामुळे सुवारेदेखील पाण्यात बुडू लागला. हे लक्षात येताच तत्काळ सहकाऱ्यांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढले. यामुळे दोघांचेही प्राण वाचले आहेत.

दुचाकीच्या धडकेत
पादचारी जखमी
लांजा ः मोटारसायकलची पादचाऱ्याला धडक बसून पादचारी गंभीर जखमी झाला. ही घटना गुरूवारी (ता. ४ ) ला सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर एकलुरे हॉस्पिटलसमोर घडली. मुंबई-गोवा महामार्गावरून चालत जाणाऱ्या सदानंद कृष्णा कांबळे (वय ७०, रा. आडवली, हसोळ बौद्धवाडी, ता. लांजा) यांना मोटारसायकल ने धडक दिली. ही मोटरसायकल रवींद्र शरद शिंदे (वय ३९, रा. वेरळ, मधलीवाडी, ता. लांजा) हा चालवत होता. या घटनेत पादचारी सदानंद कांबळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

मोटारीच्या धडकेत
दुचाकीस्वार ठार
खेड ः तालुक्यातील खेड-आंबवली मार्गावर कुडोशी गावातील आंब्रेवाडी स्टॉपजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही दुर्घटना २६ ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. रवींद्र दाजी आंब्रे (वय ५९, रा. कुडोशी आंब्रेवाडी) याने मोटार वेगाने चालवून त्या वेळी समोरून येत असलेल्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार संजोग दीपक शिंदे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक पांडुरंग गोरे यांनी दाखल केला असून, पुढील तपास खेड पोलिसांकडून सुरू आहे.

--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com