आचऱ्यात गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
swt714.jpg
89893
आचराः श्री देव रामेश्वर मंदिरात विराजमान ‘श्रीं’ची मूर्ती.
आचऱ्यात गणेशोत्सवानिमित्त
विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ७ः इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा येथील ३९ दिवसांच्या गणेशोत्सवात देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यानिमित्त बुधवारी (ता. १०) रात्री ९ वाजता व्यापारी मंडळ आचरा आणि वैभवशाली पतसंस्था पुरस्कृत हरिहर नातू (पुणे) यांचे कीर्तन, शुक्रवारी (ता. १२) रात्री ९ वाजता समर्थनगर वरची वाडी पुरस्कृत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ (कुडाळ) यांचे दशावतारी ‘ब्रह्मसंकेत’ हा नाट्यप्रयोग, १३ ला ब्राह्मण देव सांस्कृतिक विकास मंडळ पारवाडी पुरस्कृत श्री हेळेकर दशावतार नाट्य मंडळ कारिवडे यांचा नाट्यप्रयोग ‘वैभव लक्ष्मी’, १४ ला रात्री ९ वाजता शिवरामेश्वर ट्रॅव्हल्स बाणे पुरस्कृत सुधीर कलिंगण कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग ‘गोमय गणेश’, १५ ला ग्रामोन्नती मंडळ पिरावाडी पुरस्कृत कार्यक्रम, १६ ला संतोष कोदे पुरस्कृत गुरुकृपा दशावतार लोककला नाट्य मंडळ कणकवली हळवल यांचा नाट्यप्रयोग ‘सवतीचे प्रेम’, १७ ला रात्री ९ वाजता मनोज हडकर पुरस्कृत डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा गुंडू सावंत (हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे) विरुद्ध बुवा दिनेश वागदेकर (कमला प्रासादिक भजन मंडळ, शेळके वेंगुर्ले) यांच्यात रंगणार आहे. तसेच १८ ला रात्री ९ वाजता वाडोळी ग्रामस्थ आचरा भंडारवाडी यांचा ''लावण्य तारका'' ऑर्केस्ट्रा (मुंबई), २० ला रात्री ९ वाजता हिर्लेवाडी विकास मंडळ पुरस्कृत चिमणी पाखरे डान्स ॲकॅडमीचा व्हरायटी शो ‘तारका’, २१ ला डोंगरेवाडी ग्रामस्थ पुरस्कृत कार्यक्रम, २७ ला नृत्य स्पर्धा, २९ ला सत्यनारायण महापूजेनिमित्त रात्री ९ वाजता इसवटी मंडळ आचरा जामडूल व प्रवीण मेस्त्री पुरस्कृत तिरंगी डबलबारीचा जंगी सामना बुवा सुशांत जोईल (श्री महापुरुष प्राथमिक भजन मंडळ कातवण), उदय पारकर (श्री दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ कासार्डे), व सुजित परब (कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक) यांच्यात रंगणार आहे. तसेच ३ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता देऊळवाडी मित्रमंडळ पुरस्कृत जिल्हास्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धा, ४ ला श्रींची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.