आचऱा येथे आज भक्तिगीत कार्यक्रम

आचऱा येथे आज भक्तिगीत कार्यक्रम

Published on

आचरा येथे आज
भक्तिगीत कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ७ः इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे येथील चौघड्यावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सवानिमित्त बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीवाडी व संदीप पाटील, जयेंद्र पाटील यांच्यावतीने संगीत विशारद श्रृती पाटील व संगीत अलंकार अजित गोसावी यांचा भक्तिगीत गायनाचा बहारदार कार्यक्रम सोमवारी (ता. ८) रात्री ९ वाजता रामेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यांना संगीत साथ हार्मोनियम-सागर राठवड, तबला-प्रसाद करंबेळकर व पखवाज साथ संदीप मेस्त्री यांची लाभणार आहे. संगीत रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बाळगोपाळ मंडळातर्फे केले आहे.
.......................
swt712.jpg
89890
आचराः येथे अकरा दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले.

आचऱ्यात गणरायांचे
जल्लोषात विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ७ः येथील गणपती बाप्पांचे ढोलताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’च्या गजरात साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले. आरती, भजन, फुगडीच्या गजरात गेले दहा दिवस रंगून गणेशाच्या आराधनेत भाविक तल्लीन होऊन गेले होते. गणेशोत्सवात पावसाची हजेरी अधूनमधून असतानाही गणेशभक्तांचा उत्साह वाढला होता.
अनंत चतुर्दशी दिवशी येथील पारवाडी खाडी, पिरावाडी समुद्र किनारी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी आचरा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उशिरापर्यंत पारवाडी खाडी, पिरावाडी किनारी तसेच भगवंतगड कालावल खाडी आदी भागात बाप्पांना निरोप देण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com