रत्नागिरीत गणेशोत्सवाची सांगता

रत्नागिरीत गणेशोत्सवाची सांगता

Published on

rat७p४.jpg-
२५N८९९३४
रत्नागिरी : मांडवी समुद्रकिनाऱ्यावर आरती करताना भाविक.
rat७p५.jpg-
२५N८९९३५
रत्नागिरी : विसर्जनासाठी निघालेल्या गणेशाचे देखणे रूप.
rat७p६.jpg-
२५N८९९३६
रत्नागिरी : ढोलताश्यांचा गजर करत गणेशाची मिरवणूक आठ तास रंगली. (छायाचित्रे- संतोष नलावडे, रत्नागिरी)
----
ढोल-ताशांच्या गजरात गणेशोत्सवाची सांगता
अनंत चतुर्दशी; आठ तास मिरवणुका, पावसाचीही हजेरी, पोलिसांचा बंदोबस्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण करत निरोप देण्यात आला. दुपारी सुरू झालेल्या मिरवणुका रात्रीपर्यंत सुरू होत्या. दुपारी पावसाने विश्रांती घेतली, परंतु सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. परंतु नंतर पाऊस थांबल्याने भक्तांचा उत्साह आणखी वाढला. शहर व जिल्ह्यात पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेऊन बंदोबस्ताचे काम चोख बजावले.
जिल्ह्यात २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली. त्या कालावधीत पावसाने जोरदार बॅटिंग केली. परंतु नंतर पाऊस थोडासा कमी झाला. गौरी- गणपती विसर्जनाच्या दिवशी पाऊस सरीवर बरसला. गेले दोन दिवस पाऊस सरींवर पडतोय. अनंत चतुर्दशीला सकाळपासून पावसाने चांगली उघडीप दिली आणि भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गणेशोत्सवात जिल्ह्यात आरत्या, भजने यासह पारंपरिक लोककला जाखडी आणि गणेशयाग, अथर्वशीर्ष आवर्तने आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे झाले.
काल दुपारी आरती, मंत्रपुष्प आणि उत्तरपूजा झाल्यानंतर साऱ्‍या भक्तांची लगबग सुरू झाली. शहरात दुपारी २ वाजल्यानंतर वाजत-गाजत मिरवणुका सुरू झाल्या. पारंपरिक वेशभूषा आणि नटून-थटून आलेल्या महिला, पुरुष व लहान मुलांनी मिरवणुकांमध्ये आनंद लुटला. डीजेवरील बंदी बेंजो पार्टीच्या पथ्यावर पडली. रत्नागिरी शहरात सुमारे वीसहून अधिक बेंजो पथके पाहायला मिळाली. सिंथेसायजर, बुलबुलाच्या तालावर तरुणाई थिरकली. जिल्ह्यात स्थानिक पोलिस व वाहतूक पोलिसांनी मिरवणुकांच्या काळात चांगला बंदोबस्त ठेवला. कोठेही वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता पोलिसांना गणेशभक्त, मंडळांचे कार्यकर्ते वेळोवेळी मदत करत होते.

चौकट १
मांडवी किनाऱ्‍यावर निर्माल्य संकलन
मांडवी समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणे निर्माल्य संकलन करण्यात आले. यामध्ये एनसीसी, महाविद्यालयीन स्तरावरील एनएसएस छात्रांनी आणि शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सुमारे दोन ट्रक निर्माल्य संकलित झाले. या निर्माल्यावर भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रात प्रक्रिया करून खत बनवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com