वेदनामुक्त आयुष्याची गुरुकिल्ली

वेदनामुक्त आयुष्याची गुरुकिल्ली

Published on

लेखाचे डोके ः फिजिओथेरपी दिन विशेष

वेदनामुक्त आयुष्याची गुरुकिल्ली

लीड
फिजिओथेरपिस्ट म्हणजे खरेतर आरोग्याचे देवदूत. आजारपण, अपघात, शारीरिक विकार यामुळे जेव्हा आयुष्य बिछान्यापुरते मर्यादित होते, तेव्हा पुन्हा नव्या जोमाने उभे करण्याचे कार्य फिजिओथेरपी करते. वाढते प्रदूषण, ताणतणाव, अपघात आणि दुर्लक्ष यामुळे आजच्या पिढीला विविध शारीरिक विकारांनी ग्रासले आहे. संधिवात, हाडांचे विकार, अर्धांगवायू, हृदयविकार, दमा, फुफ्फुसांचे विकार, स्नायूंच्या समस्या या आजारांवर फिजिओथेरपी हा प्रभावी उपाय ठरतो.
---------------
विविध उपकरणे व व्यायामांच्या माध्यमातून शारीरिक अवयवांचे पुनर्वसन करणे म्हणजे फिजिओथेरपी. शस्त्रक्रियेनंतर स्नायू पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी, लहानपणापासून असलेल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी किंवा घरी उपचार घेण्याच्या सोयीसाठीही याचा मोठा उपयोग होतो. अर्धांगवायू झालेल्या रुग्णांनी फिजिओथेरपीमुळे पुन्हा चालणे, बोलणे, आणि सामान्य जीवन जगणे शक्य केले आहे. फिजिओथेरपीमध्ये औषधांचा वापर न करता व्यायाम, मसाज, उष्ण-शीत उपचार, अल्ट्रासाऊंड, इलेक्ट्रोथेरपी अशा पद्धतींनी उपचार केले जातात. यामुळे दुखणे कमी होते, हालचाली पुन्हा सहज होतात व स्नायूंची ताकद वाढते.
मानदुखी ही आजच्या जीवनशैलीत सर्वसामान्य समस्या झाली आहे. मानेतील मणके जवळजवळ २० पौंडांचे डोके पेलतात. त्यामुळे मान हा कण्याचा सर्वात गतिशील व नाजूक भाग आहे. चुकीची बसण्याची पद्धत, सतत मान पुढे काढून काम करणे, स्थूलपणा, स्नायूंची कमजोरी यामुळे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिससारखे आजार निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी औषधांसोबत फिजिओथेरपीचा उपयोग फार मोठा आहे. विश्रांती, योग्य उशी, आवश्यक असल्यास कॉलरचा आधार उपयोगी पडतो. मात्र, तो अल्पकाळच वापरावा. योग्य व्यायाम, विश्रांती, आणि कामाच्या वेळी शरीराची योग्य स्थिती ठेवली, तर मानदुखीवर निश्चितच मात करता येते. एकूणच फिजिओथेरपी ही आधुनिक वैद्यकशास्त्रातील महत्त्वाची व सुरक्षित पद्धत आहे. योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली फिजिओथेरपी रुग्णाला औषधावरील अवलंबित्व कमी करून निरोगी जीवन जगण्यास मदत करते.
---------------
फिजिओथेरपीचे प्रकार
मॅन्युअल थेरपी – हाताने केलेला मसाज, ताण देणे, सांध्यांचे हालचाली सुधारणे
इलेक्ट्रोथेरपी – विद्युतप्रवाहाद्वारे वेदना कमी करणे
हायड्रोथेरपी – पाण्यात व्यायाम करून स्नायूंवरचा ताण कमी करणे
उष्ण-शीत उपचार – गरम किंवा थंड पट्ट्यांद्वारे स्नायू शिथिल करणे
व्यायाम थेरपी – रुग्णाच्या गरजेनुसार वेगवेगळे व्यायाम
-----------------
फिजिओथेरपी कधी आवश्यक0
सांधे किंवा स्नायू दुखणे
शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन
लठ्ठपणामुळे हालचालींमध्ये अडचण
न्यूरोलॉजिकल आजार (पक्षाघात, लकवा)
खेळात झालेल्या दुखापती
दीर्घकालीन पाठदुखी वा मानदुखी
------------------
चौकट
शिक्षण आणि करिअर
या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी १२ वी (विज्ञान शाखा) व प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम साडेचार वर्षांचा आहे. समाजसेवेबरोबरच करिअर घडवण्याची सुवर्णसंधी या शाखेत आहे. मुलं-मुली दोघांचाही या क्षेत्राकडे वाढता कल दिसतो आणि परदेशात नोकरीच्या संधीही उपलब्ध आहेत.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com