दीपकभाई केसरकर मंडळामार्फत ''गुरुसेवा सन्मान'' पुरस्कार जाहीर

दीपकभाई केसरकर मंडळामार्फत ''गुरुसेवा सन्मान'' पुरस्कार जाहीर

Published on

दीपकभाई केसरकर मंडळामार्फत
''गुरुसेवा सन्मान'' पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः आमदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी पुरस्कार २०२५-२६ चे ''गुरुसेवा सन्मान'' पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. गेली बारा वर्षे शैक्षणिक क्षेत्रातील अंगणवाडी ते महाविद्यालयातील कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य सेवा बजावणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनींची निवड या पुरस्कारासाठी करून उत्तेजन व प्रेरणा दिली जाते. या पुरस्कारासाठी २०२५ करिता पुढील शिक्षकांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
सावंतवाडी-दीपक राऊळ (जिल्हा परिषद तिरोडे शाळा क्र. १), अभिजित जाधव (कलंबिस्त हायस्कूल कलंबिस्त), कुडाळ-बाबाजी भोई (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद शाळा माणगाव), राजेंद्र राठोड (भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड), वेंगुर्ले- रामा पोळजी (जिल्हा परिषद शाळा मठ), शीला सामंत (एस. आर. पाटील विद्यालय पाट), मालवण-देविदास प्रभुगावकर (जिल्हा परिषद शाळा रेवतळे), राजू देसाई (भंडारी हायस्कूल मालवण), देवगड-स्वाती हिंदळेकर (जिल्हा परिषद शाळा दाभोळे क्र. २), आफ्रीन बागी (देवगड हायस्कूल देवगड), कणकवली-वंदना राणे (कणकवली क्र. १), स्मिता गरगटे (एस. एस. हायस्कूल कणकवली), दोडामार्ग-प्रवीण देसाई (जिल्हा परिषद शाळा झोळंबे), समीर परब (झोळंबे हायस्कूल), वैभववाडी-शोभाताई केळकर (खांबाळे विद्यामंदिर), संदेश तुळसलकर (अर्जुन रावराणे हायस्कूल वैभववाडी). विशेष गौरव पुरस्कार-बाबली चिले (सांगेली क्र. १), शंकर पावस्कर (वेर्ले क्र. १), संगीता सावंत (ओटवणे क्र. १), घनदा शिंदे (चराठा क्र. १), उन्नती कराळे (जिल्हा परिषद शाळा तिरवडे मालवण), अनुराधा गावडे (अंगणवाडी, पेडवे कारिवडे), सुनीता दळवी (डायट, पुणे). निवड समिती सदस्य म्हणून भरत गावडे, विठ्ठल कदम, म. ल. देसाई, मनोहर परब, संजीवनी फडके, रोहिणी मसूरकर यांनी काम पाहिले. पुरस्कार वितरणाची तारीख आमदार दीपक केसरकर यांच्या उपलब्धतेनुसार कळविण्यात येईल, असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com