लोकमान्य वाचलानयाची १४ ला सभा
लोकमान्य वाचनालयची
१४ला सर्वसाधारण सभा
लांजा ः लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थेची २०२४-२५ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी १४ सप्टेंबरला सायंकाळी ३.३० वाजता लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. वार्षिक सभेत निधन पावलेल्या ज्ञात-अज्ञात मान्यवरांना श्रद्धांजली, मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे. २०२४-२५च्या अखेरच्या जमाखर्चास मान्यता देणे, २०२४-२५ चे अंदाजपत्रक जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे. २०२५-२६चे अंदाजपत्रकीय जमाखर्च तरतुदीचे वाचन करणे. २०२४-२५च्या ऑडिट रिपोर्टचे वाचन करणे. अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे, आदी विषय घेण्यात येणार आहे़त. तरी या सभेला सर्व संस्था सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. अभिजित जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर यांनी केले आहे.
ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त
शृंगारतळी येथे मिरवणूक
गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील मजलिसे कबुलुल्लाह हुसैनी कमिटीच्यावतीने ईद-ए-मिलादुन्नबी या सणानिमित्त वेळंब मदरसा ते पालपेणे फाटापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. शृंगारतळी येथील शृंगारतळीच्या गणपती राजाला या वेळी मजलिसे कबुलुल्लाह हुसैनी कमिटी व मुस्लिम बांधवांच्यावतीने मानवंदना देण्यात आली आणि गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. सरबत वाटप करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी झाल्याने सामाजिक सलोखा व एकता दिसून आली. या मिरवणुकीदरम्यान गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप भोपळे व सर्व पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
जिल्हा काँग्रेसची आज बैठक
चिपळूण ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक व प्रशिक्षण शिबिर उद्या (ता. ८) सकाळी ११ वाजता चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे. शहरातील धवल व्यापारी संकुल येथे ही बैठक होणार आहे. अशी माहिती उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी दिली आहे. घाग यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर घाग यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस बळकटीकरणाच्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्यासाठी आढावा बैठक व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीत संघटनात्मक आढावा घेण्याबरोबरच आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी या बैठकीला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन घाग यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.