कोयनेत सरासरीपेक्षा जास्त पाऊस
कोयनेत सरासरीपेक्षा जास्त पाऊस
शिवसागरात १५७.९५ टीएमसी पाणी ; पाण्याचा प्रश्न मिटला
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ ः कोयना पाणलोटात चालू हंगामात वार्षिक सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होत आहे. कोयनेत आतापर्यंत धरण क्षमतेच्या दीडपट पाण्याची आवक झाली. १०५.२५ टीएमसी (अब्ज घनफूट) क्षमतेच्या कोयना शिवसागरात यंदा आतापर्यंत १५७.९५ टीएमसीची पाणी उपलब्ध आहे.
कोयना धरणाच्या तांत्रिक वर्ष एक जूनपासून सुरू होते. कोयना पाणलोटात गेल्या दोन दिवसांपूर्वी एकूण सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला. तर रविवारी धरणात १५० टक्के पाणी साचलेले आहे. एकूण साठ्यापैकी धरणसाठा नियंत्रणासाठी कोयनेच्या सहा वक्री दरवाजातून विनावापर ५२.३५ टीएमसी तर, पायथा वीजगृहातून १०.१७ टीएमसी, असे ६२.५२ टीएमसी म्हणजेच धरण क्षमतेच्या ५९.४० टक्के पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. सध्या कोयनेचा जलसाठा १०३.९५ टीएमसी असून, धरणात १३ हजार ८११ क्युसेकची (प्रतिसेकंद घनफूट) पाण्याची आवक होत आहे. कोयनेतील हा जलसाठा समाधानकारक असून, त्यामुळे कोयनेतून होणाऱ्या वीजनिर्मिती आणि धरणाखालील कृष्णा- कोयना नद्यांकाठी पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. सध्या धरणाचे दरवाजे एक फूट उघडले गेल्याने त्यातून ९ हजार १०० क्युसेक, पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेक अशा ११ हजार २०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग होत आहे. कोयनेच्या पाणलोटात रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नवजाला १० एकूण ५ हजार ४८१ मिमी., महाबळेश्वरला २९ एकूण ५ हजार २९८ मिलिमीटर तर, कोयनानगरला केवळ दोन एकूण ४ हजार ३८४ मिमी. पावसाची नोंद आहे. एकूण सरासरी पाऊस ५ हजार ०५४.३३ मिमी नोंदला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.