महामार्गाच्या धिम्या कामाचा स्थानिकांना फटका
-rat८p११.jpg-
२५N९०१६८
मंडणगड : आंबडवे-राजेवाडी महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
----
धिम्या कामाचा स्थानिकांना फटका
आंबडवे ते राजेवाडी महामार्ग ; बस थांबे, वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ ः आंबडवे ते महाड राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचे काम धिम्या गतीने सुरू असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. महामार्गावर बस थांबे, दिशादर्शक फलक अजूनही लावण्यात आले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच दुतर्फा अपेक्षित वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
मागील सात ते आठ वर्षांपासून या महामार्गाचे काम धीम्या गतीने प्रगतिपथावर आहे. मोठ्या कालावधीत सुरू असलेल्या महामार्गाच्या या कामांमुळे प्रवाशांसह नागरिकांना मार्गावरील अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे किमान या बांधकाम हंगामात या मार्गाचे काम पूर्णत्वाकडे जाण्याच्या अपेक्षांनी या प्रकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाचे पावसात रस्त्यावर खड्डे पडून बऱ्याच अंतरात रस्त्याची चाळण झाली आहे. आंबडवे-लोणंद हा तालुक्यातून जाणाऱ्या एकमेव राष्ट्रीय महामार्गातील आंबडवे ते राजेवाडी दरम्यानचे रस्त्याचे नूतनीकरण कॉंक्रिटीकरणाने होत आहे. हे अंतर सुमारे साठ किमी असून कामाची सुरवात २०१७-१८ साली करण्यात आली. मात्र अनेक कारणांनी कामाला मोठ्या कालावधीने विलंब होत असल्याने महामार्गाचे काम बहुचर्चित झाले. या कामासंदर्भात अनेक वेळा अनेकांनी आंदोलनात्मक भूमिकाही घेतली. गेल्या सहा ते सात वर्ष हा प्रकल्प केंद्र शासनाच्या अखत्यारित असूनही रखडला आहे. या मार्गाच्या कामादरम्यान खड्डे व नादुरुस्त रस्त्यामुळे प्रवासी, वाहनधारकांचे हाल होत आहेत. नूतनीकरणाने या मार्गाच्या अंतरातील आजूबाजूच्या परिसरात सुबत्ता निर्माण होईल यात शंका नाही. पर्यटनाबरोबर, दळणवळणासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल. मात्र भविष्यकालीन वाढती रहदारी आणि लोकवस्ती, वाढते शहरीकरण लक्षात घेऊन मार्गाच्या कामाचा चांगला दर्जा असावा यासाठी येथील नागरिक आग्रही आहेत. दरम्यान, नूतनीकरणात स्थानिकांची मागणी, भौगोलिक रचना यांचा विचार करण्यात यावा अशा मागणीने जोर धरला आहे. मार्गाची निर्मिती होत असताना अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक सुरक्षेची काळजी घेण्यात आली नाही. रस्त्यामधील अनेक धोकादायक वळणे, चढउतार अनेक ठिकाणी तशीच ठेवण्यात आली आहेत. भविष्यकालीन विचार व मार्गात असलेले दोष काढून सुस्थितीत नव्याने मार्ग निर्मितीची महामार्ग प्राधिकरणाची ख्याती असते. त्या गुणवत्तेत या मार्गाची निर्मिती करणे गरजेचे आहे. भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊन स्थानिकांना त्यांना सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
चौकट
सांडपाण्याचा निचरा कुठे होणार?
रस्त्याच्या बाजूने बांधलेल्या गटारांमधील सांडपाण्याचा निचरा कोठे होणार आहे या प्रश्नांचे उत्तर मिळालेले नाही. तालुक्यातील भिंगळोली येथे हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे कामाची गुणवत्ता व कामाची गती यांचा समन्वय साधून लवकर काम करण्याची मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.