मत्स्य विद्यापीठासंबधी अहवाल १२ वर्षे धूळ खात
-rat८p१४.jpg-
२५N९०१८१
रत्नागिरी ः कोकण किनारपट्टीवर मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असूनही विद्यापीठ नागपुरातील पशुविज्ञान विद्यापीठाला जोडण्याचा घाट घातला जात आहे.
---------
समुद्र कोकणात, विद्यापीठ नागपुरात-------लोगो (भाग १)
मत्स्योत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर कोळंबी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील एकूण मत्स्य उत्पादनापैकी ४ लाख ३४ हजार टन म्हणजे ७२ टक्के उत्पादन ७२० किलोमिटीर लांबीच्या कोकण किनारपट्टीवर होते. त्यातील १२०० कोटींचे उत्पादन निर्यात होत असतानाही मत्स्यविज्ञान विद्यापीठ कोकण किनारपट्टीपासून दोन हजार किलोमीटर अंतरावरील नागपूरच्या पशुविज्ञान विद्यापीठाला जोडण्याचा निर्णय केवळ विदर्भाला खूष करण्याकरिता राजकीय दबावामुळे निर्णय घेतला गेला. गोड्या पाण्यातील केवळ १.४६ लाख मे. टन मत्स्योत्पादनासाठी नागपूर येथे महाविद्यालय सुरू करणे एकवेळ समजण्यासारखे आहे. परंतु १९९८ साली पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुरात अस्तित्वात आल्यानंतर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रे, पशुधन प्रशिक्षण व रत्नागिरीतील मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपुरच्या पशुविज्ञान विद्यापीठाला जोडण्याचा उफराटा निर्णय झाला. महाराष्ट्रातून बरीच ओरड झाल्यानंतर १७ नोव्हेंबर २००० रोजी महाराष्ट्र सरकारने नोटीफिकेशन काढून मत्स्य विज्ञान महाविद्यालय दापोलीच्या कृषी विद्यापीठाला संलग्न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोकणाला लाभलेल्या शेकडो किनारपट्टीवर मत्स्यविद्यापिठ नाही, ही शोकांतिकाच म्हणायला हवी. रखडलेला मत्स्य विद्यापीठाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या मालिकेचा पहिला भाग....
प्रतिनीधी
-----
मत्स्य विद्यापीठाचा अहवाल धूळ खात
मुणगेकर समितीची २००८ मध्ये स्थापना ; वर्षभरात कार्यवाही होती अपेक्षित
रत्नागिरी, ता. ५ ः रत्नागिरी व नागपूर महाविद्यालय स्वतंत्र कायद्याने अस्तित्वात आलेली आहेत. साधारणतः आठ वर्षांपूर्वी नागपूरमधील पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाकडे पुरेसा निधी व कर्मचारी नसल्यामुळे महाराष्ट्र विधीमंडळात या प्रश्नावर चर्चा झाली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे २६ मे २००८ मध्ये डॉ. मुगणेकर समिती नेमण्यात आली आणि समिती निर्णय देईल, त्याठिकाणी वर्षभरात कोकणात मत्स्यविज्ञान विद्यापीठ गठीत करण्यात येईल, असे निःसंदिग्ध आश्वासन देण्यात आले. परंतु त्या मुणगेकर समितीचा अहवाल गेली १२ वर्षे धूळ खात पडला आहे, अशी माहिती कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी दिली.
मत्स्य विद्यापिठ कोकणात का हवे आहे, याबाबत अॅड. पाटणे म्हणाले, कोकणातील नद्या, खाड्या, समुद्र व ७० खाड्यांच्या भोवती असलेले १४ हजार ४४५ हे खाजणक्षेत्र मत्स्यशेतीला उपलब्ध आहे. परंतु त्यातील केवळ ५ टक्के क्षेत्र निमखा-या पाण्यातील मत्स्यशेतीकरीता वापरले जाते. याउलट गुजरातमध्ये ५० टक्के वापरले जाते. कोकणातील विद्यार्थ्यांना फिशरीज इंजिनिअरींगचे पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. अॅक्वाकल्चर संबंधीचे प्राथमिक स्तरावरील तांत्रिक शिक्षण केंद्र सरकारच्या समुद्र उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणामार्फत पनवेल येथे दिले जाते. तर अतिशय उच्च दर्जाचे तंत्रशिक्षण केंद्रिय मत्स्य विज्ञान शिक्षण संस्था मुंबई येथे दिले जाते. वस्तुतः फिशरीज इंजिनिअरींगचे सर्व प्रकारचे पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण कोकणात उपलब्ध झाले पाहिजे. मत्स्यविद्यापिठ अंतर्गत मालवण, दापोली व अलिबाग येथे मत्स्यविद्यालय सुरु केली पाहिजेत. विशेष करुन मत्स्यउपलब्धी व्यवस्थापन, मत्स्य पर्यावरण, मत्स्य काढणी पश्चात तंत्रज्ञान इत्यादी अभ्यासक्रमाचा अंतर्भाव झाला पाहिजे. महाराष्ट्रात गोड्या पाण्याच्या क्षेत्रात १.५७ लक्ष टन तर कोकण किनारपट्टीवर ४ लाख ३२ हजार ७४८ टन मत्सोत्पादन होते हे आपण प्रकर्षाने लक्षात घेतले पाहीजे. महाराष्ट्रातून जवळजवळ १ लाख ८६ हजार २४७ टन मासे निर्यात होवून ५ हजार ८७८ कोटी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध होते, असे तज्ज्ञ डॉ. केतन चौधरी यांचे मत आहे.
-----
चौकट १
रोजगाराच्या संधी वाढतील
केरळ व तामिळनाडूमध्ये १० ते ११ वर्षांपासून स्वतंत्ररित्या मत्स्यविद्यापीठ सुरु झाली आहेत. आम्ही मात्र चर्चा, घोषणा, समिती व अहवाल यात पुरते अडकलो आहोत. मुंबई, पनवेल, मूळधे, रत्नागिरी, नागपूर आणि उदगीर येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालये व संशोधन केंद्रे एकत्र करुन कोकणात स्वतंत्र मत्स्य व समुद्र विज्ञान विद्यापीठ झाल्यास नवीन अभ्यासक्रम, संशोधन होऊन पूर्ण क्षमतेने मत्स्यव्यवसाय वाढीला लागून रोजगाराच्या संधी वाढतील आणि मत्स्य विज्ञानाची एक शैक्षणिक संस्कृती कोकणात उदयाला येईल, असे पाटणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.