रत्नागिरी-जाहिरात बातमी
-rat८p१७.jpg-
२५N९०१८८
रत्नागिरी : टीआरपी येथे सुरेख मोटर्स- मोटोहाऊसच्या शोरूमचे उद्घाटन करताना मंत्री उदय सामंत. सोबत श्रेयस सावंत, तुषार शेळके, संतोष तावडे, सुनील शेळके आदी.
---------
सुरेख मोटर्स- मोटोहाउसचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : मोटोहाउस आणि टीआरपी येथील सुरेख मोटर्स यांच्यामध्ये भागीदारी झाली असून, ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर आता रत्नागिरीकरांसाठी उपलब्ध होणार आहे. या नव्या शोरूमचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी मोटोहाऊसचे व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके, सुनील शेळके, बांधकाम व्यावसायिक संतोष तावडे व सुरेख मोटर्सचे संचालक श्रेयस सावंत प्रमुख उपस्थित होते. केएडब्ल्यू वेलोस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचा (केव्हीएमपीएल) व्यावसायिक उपक्रम असलेला मोटोहाउस भारतात विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आता टीआरपी, अंबर हॉलशेजारी सुरेख मोटर्स येथे ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटालियन व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रॉनिक वाहने उपलब्ध होणार आहेत. ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर लोकप्रिय आहेत. यात क्रॉसफायर ५०० एक्स, क्रॉसफायर ५०० एक्ससी, क्रॉमवेल १२०० आणि क्रॉमवेल १२०० एक्स यांचा समावेश आहे. या गाड्या उत्कृष्ट डिझाईन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध आहेत. व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर ही शहरी वाहनांची उत्कृष्ट निवड आहे. व्यवस्थापकीय संचालक शेळके म्हणाले, मोटोहाउस व्यवसायाचा विस्तार करत असून जागतिक दर्जाची अत्याधुनिक वाहने रत्नागिरीतही उपलब्ध होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.