गणेशोत्सवात ६ टन निर्माल्य संकलित
swt813.jpg
90218
कणकवली ः तालुक्यात गणेशविर्सजनस्थळी निर्माल्याचे संकलन करताना डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य.
गणेशोत्सवात ६ टन निर्माल्य संकलित
धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकारः कंपोस्ट खत निर्मितीसाठी अभियान
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ८ः जिल्ह्यातील गणेशोत्सवात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पर्यावरणपूरक उपक्रमाचा एक मोठा टप्पा पार पडला. जिल्ह्यात विविध ठिकाणांवर ६ टन निर्माल्य संकलित करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात आला.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रतिष्ठानाच्या श्रीसदस्यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याने विविध ठिकाणांवर निर्माल्य गोळा केले. यामध्ये मालवण तालुक्यातील बंदर जेटी, चिंदर, सावंतवाडीतील बांदा, चराठा, कणकवलीतील जानवली, हळवल, कासार्डे, फोंडाघाट, कुडाळत पिंगुळी, वेंगुर्ले येथे अणसूर, देवगडात शिरगाव तसेच वैभववाडी येथे कोकिसरे अशा १३ वेगवेगळ्या ठिकाणांचा समावेश होता. गणेशोत्सवात दिड दिवस ते अकरा दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान, पाण्याच्या स्त्रोतांमध्ये टाकले जाणारे निर्माल्य वाया जाऊ नये आणि पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. संकलित केलेल्या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करून भविष्यात प्रतिष्ठानतर्फे लागवड केलेल्या हजारो वृक्षांच्या संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे. प्रतिष्ठानाच्या सदस्यांनी नागरिकांना निर्माल्य संकलनासाठी सक्रियपणे आवाहन केले, ज्यामुळे सुमारे ४०५ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचेही सहकार्य लाभले. प्रतिष्ठानाच्या या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृक्ष संवर्धन व पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.