विद्यार्थ्यांच्या स्वलिखित कवितांचा रंगला ‘काव्यरंग’
rat९p८.jpg-
P२५N९०३१९
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात आयोजित काव्यरंग कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थिनीला बक्षीस देताना प्रा. मानसी चव्हाण. सोबत प्राचार्य मधुरा पाटील आदी.
विद्यार्थ्यांच्या कवितांचा रंगला ‘काव्यरंग’
‘देव, घौसास कीर’मध्ये आयोजन ; श्रोत्यांकडून भरभरू दाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : येथील देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळातर्फे काव्यरंग-एक साहित्यिक साज हा कार्यक्रम रंगला. विद्यार्थ्यांनी स्वलिखित कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांना या द्वारे एक व्यासपीठ उपलब्ध झाले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘काव्यरंग’ला एक संस्मरणीय साहित्यिक साज चढवला.
वाङ्मय विभागप्रमुख प्रा. वसुंधरा जाधव यांनी प्रास्ताविक करताना वाङ्मय विभागाचे वर्षभरातील कामाचे स्वरूप याबाबत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कविता वाचनास सुरुवात केली, ज्यात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील स्वलिखित कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. ''काव्यरंग'' या कवितांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थी कवींमध्ये उत्कृष्ट कवींना गौरवण्यात आले. वरिष्ठ महाविद्यालयातून मराठी विभागामध्ये प्रथम तन्वी पटवर्धन (प्रथम वर्ष वाणिज्य), द्वितीय शुभांगी पोटे (प्रथम वर्ष कला), इंग्रजी विभागामध्ये प्रथम गौरवी ओळकर (द्वितीय वर्ष वाणिज्य) तसेच कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम श्रद्धा सनगरे (बारावी वाणिज्य), द्वितीय आरती रेवाळे (बारावी विज्ञान), तृतीय ऋतुजा खांडेकर (बारावी, वाणिज्य) विजेते ठरले.
प्रमुख वक्त्या प्रा. मानसी चव्हाण यांनी साहित्य आणि समाज–प्रतिबिंब की परिवर्तन? या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्र. प्राचार्या मधुरा पाटील व प्रा. ऋतुजा भोवड उपस्थित होत्या. प्रा. वसुंधरा जाधव, प्रा. वीणा कोकजे व प्रा. प्रियांका कुंभार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.