इंग्लंडमधील स्पर्धेत सहावे शतक
- rat९p१२.jpg-
२५N९०३५०
अविराज गावडे
अविराजचे इंग्लंडमध्ये सहावे शतक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः येथील युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी स्पर्धेत नाबाद शतकी खेळी करत सहाव्यांदा मॅन ऑफ दी मॅचचा मान पटकावला आहे. त्याच्या भरीव कामगिरीने संघाला विजय मिळवून दिला.
शेवटच्या सामन्यामध्ये रिजेंटस् पार्क संघाविरुद्धच्या सामन्यामध्ये अविराज गावडे खेळत असलेल्या पेशवा संघाने ४५ षटकांमध्ये २५६ धावसंख्या उभारली. या सामन्यामध्ये अविराजने आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवत नाबाद ११० धावा ठोकल्या. अविराज ९८.२१ च्या सरासरीने ११२ चेंडूमध्ये ११० धावा करत नाबाद राहिला. त्यात त्याच्या ११ चौकारांचा समावेश होता. अविराजने या आधीही कौंटी स्पर्धेत गोलंदाजी व फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती; मात्र त्याने शेवटच्या सामन्यात खेळताना शतक ठोकून आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात प्रत्युत्तरादाखल रिजेंट्स पार्क संघाला सर्व बाद १४६ धावा करता आल्या. अविराजने ५ षटके टाकत १ बळी घेतला. अविराजच्या अष्टपैलू कामगिरीमुळे या मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ दी मॅचचा किताब बहाल करण्यात आला. अविराजचा हा सहावा सामनावीर किताब आहे. अविराजला इंग्लंडमध्ये मिडलसेक्स संघाकडून कौंटी स्पर्धेत खेळण्यासाठी चार महिन्यासाठी करारबद्ध करण्यात आले होते. अविराज आता उद्या (ता. ११) ला भारतात परतत आहे.