जनमताचा आदर ही महायुतीची जबाबदारी

जनमताचा आदर ही महायुतीची जबाबदारी

Published on

swt910.jpg
90366
सिंधुदुर्गनगरीः जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना शुभेच्छा देताना आमदार नीलेश राणे. बाजूला जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, दीपलक्ष्मी पडते आदी.

जनमताचा आदर ही
महायुतीची जबाबदारी
निलेश राणेः सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची भेट
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ९ः महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने जनमताचा मोठा कौल दिला आहे. त्याचा आदर राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच महायुतीतील पक्षांनी एकमेकांविरोधात टीका टिप्पणी न करता महायुतीचा धर्म पाळावा, असे मत आमदार नीलेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले. त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची आज सदिच्छा भेट घेतली.
सिंधुदुर्गसह अन्य ठिकाणी जाणारी गोवा बनावटीची दारू व ड्रग्ज हे सर्व बेकायदेशीर धंदे सिंधुदुर्ग पोलिसांनी मोडून काढावेत व तरुण पिढीला वाचवावे, यासाठी पुन्हा एकदा आमदार राणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची सदिच्छा भेट घेत लक्ष वेधले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचीही सदिच्छा भेट घेत त्यांच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, संजय पडते, महिला जिल्हा प्रमुख दीपलक्ष्मी पडते, सरचिटणीस दादा साईल, आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, ‘‘जिल्हा प्रशासन प्रमुखांची आजची सदिच्छा भेट होती. जिल्हाधिकारी नव्याने हजर झाले असून पहिल्या भेटीत मी नागरिकांच्या तक्रारी मांडणार नाही किंवा त्याबाबतची निवेदने दिलेली नाहीत, तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. नागरिकांची गतिमान कामे व्हावी, ही अपेक्षा आहे. यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे. सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. या भागातील नागरी सुविधांकडे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com